Hair Care Tips :मऊ मुलायम केसांसाठी स्ट्रेटनिंग करताय? मग आधी या गोष्टींचा विचार करा

एखाद्या चांगल्या आणि अनुभवी हेअर स्टायलिस्टकडून केस स्ट्रेट करून घ्या
Hair Care Tips
Hair Care Tips esakal

Hair Care Tips :

मऊ मुलायम केस कोणाला आवडत नाहीत? बर्‍याचदा निर्जीव किंवा कुरळे केस असलेल्या मुलींना केस सरळ करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणण्याची आवड असते, परंतु केस स्ट्रेट करण्याआधीच त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका येतात. केस गळू शकतात, केस कायमचे खराब होऊ शकतात, केसांचे पोषण नष्ट होऊ शकत नाही, असे अनेक प्रश्न भेडसावतात.

जर तुम्हीही स्ट्रेट करण्याचा विचार करत असाल आणि हे प्रश्न तुमच्या मनातही निर्माण होत असतील. तर चला आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो. हेअर स्ट्रेटनिंगशी संबंधित सर्व गोष्टी येथे आहेत.

Hair Care Tips
Hair Washing Mistakes: शॅम्पू करताना करू नका या चुका; नाहीतर केस गळतीला होईल सुरुवात

केस स्ट्रेट करणे म्हणजे काय?

केस स्ट्रेट करणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्याच्या मदतीने उष्णता आणि रसायनांनी कोरडे, निर्जीव किंवा कुरळे केस पूर्णपणे सरळ आणि रेशमी बनवले जातात. हे मुख्यतः दोन प्रकारे केले जाते – टेंम्पररी आणि पर्मनंट.

केस स्ट्रेट केल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवा

स्ट्रँड टेस्ट करा, ज्यामध्ये केमिकलची केसांची रिऍक्शन तपासली जाते. जर काही रिऍक्शन असेल तर ते अगोदरच माहित असले पाहिजे. एखाद्या चांगल्या आणि अनुभवी हेअर स्टायलिस्टकडून केस स्ट्रेट करून घ्या, जो तुमच्या केसांना योग्य प्रोडक्ट लावतो आणि तुमच्या केसांना गडबड करत नाही.

Hair Care Tips
Hair Care: सॉफ्ट आणि सिल्की केसांसाठी घरीच बनवा हेअर जेल, जाणून घ्या बनवण्याची पद्धत...
  • केस स्ट्रेट केल्यानंतर, सर्व सूचनांचे पालन करा. तुमचा शॅम्पू बदला. ज्या दिवशी तुमचे केस स्ट्रेटनिंग पूर्ण होईल त्या दिवशी खबरदारी घ्या.

  • केस मोकळे ठेवा ते वर उचलून क्लच करू नका.

  • स्ट्रेट केल्यावर पहिला शॅम्पू हेअर स्टायलिस्टकडूनच करून घ्या. शॅम्पूनंतर घरीच हेअर स्पा करा. सल्फेट युक्त शॅम्पू वापरू नका.

  • नैसर्गिक केस आणि रासायनिक उपचार केलेल्या केसांच्या गुणवत्तेत नक्कीच फरक आहे, म्हणून जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल आणि तुमच्या केसांची चांगली काळजी घेऊ शकता तेव्हाच असा निर्णय घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com