Hair Care Tips : केसांना लावलेली मेहंदी तीन महिने टिकेल, फक्त भिजवताना ही पद्धत वापरा

प्रत्येक महिन्याच्या सामानाच्या यादीत हेअर डाय, मेहंदीही असतेच
Hair Care Tips
Hair Care Tips esakal

Hair Care Tips :

सणासुदीच्या दिवसात जशी गोड- धोड पदार्थ अन् घरातल्या सामानाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. अगदी तशीच हेअर डाय, मेहंदीच्या पाकिटांचीही होतेच. हे डाय वापरण्याच महिला अन् पुरुष दोघेही आग्रही असतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सामानाच्या यादीत हेअर डाय, मेहंदीही असतेच.

कारण केसांच्या पिकण्याचे, पांढरे होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.  पिकलेले केस जगाच्या लाजेने का होईना पण लपवावेच लागतात. अन् त्यासाठी मेहंदीचा वापर करावा लागतो.

Hair Care Tips
Skin and Hair Care : केस आणि त्वचेसाठी महत्वाच्या टिप्स

हेअर डायचा रंग महिनाभरातच उतरतो त्यामुळे प्रत्येक महिन्याला ते लावावेच लागतात. मेहंदी नॅचरल असली तरी तिचीही सेमच कंडिशन असते. तुम्हीही पिकलेल्या केसांना सतत मेहंदी लावून कंटाळला असाल तर एक ट्रिक आहे. जी तुम्हाला मदत करेल.

तुम्ही मेहंदी लावत असाल तर ती कशी भिजवायची याची एक ट्रिक पाहुयात. जिचा वापर केलात तर तुम्हाला तीन महिने तरी केसांकडे पहावे लागणार नाही.

Hair Care Tips
Mehandi Design : हे काय नवीन! नवरीने हातावर नाही तर चक्क ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी

मेहंदी अशी भिजवा

वेगळ्या पद्धतीने मेहंदी भिजवण्यासाठी तुम्हाला चहापूडीचे पाणी, १ चमचा हळद, सव्वा चमचा मेथी पावडर, १ चमचा मोहरीचे तेल या वस्तू लागतील.

मेहंदी पावडर एका लोखंडी कढईत काढून घ्या. त्यानंतर यात हळद, मेथी पावडर, मोहरीचे तेल घाला. मिश्रण एकजीव करून त्यामध्ये लागेल तसे चहाचे पाणी घाला.

२४ तास ठेवणे

हे मिश्रण लगेचच लावू नका. तर ते झाकून २४ तास लोखंडाच्या कढईत ठेवा. लोखंडामुळे मेहंदीचा रंग अधिकच खुलतो. त्यामुळे केसांवर लावल्यानंतर मेहंदीचा गंर जास्त दिवस केसांवर टिकतो.

Hair Care Tips
Hair Care Tips: ट्रीटमेंटनंतर केसांना लगेचच तेल लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com