आठवड्यातून कितीवेळा करावा Hair Wash...

केसांची स्वच्छता किंवा केस धुणं हे खरं तर तुमची लाइफस्टाइल आणि कामाचं स्वरुप यावरही अवलंबून असतं. साधारणपणे आठवड्यातून २ किंवा ३ वेळा केस धुणं गरजेचं आहे
केसांची निगा
केसांची निगा Esakal
Updated on

केसांची काळजी घेत असताना केसाला नियमित तेलाने Hair Oil मालिश करणं, हेअर पॅक किंवा मास्क लावणं या सोबतत नियमितपणे केस धुणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आठवड्यातून किती वेळा केस धुता तसंच केस धुण्यासाठी वापरण्यात येणारा शॅम्पू, पाणी तसचं इतर अनेक गोष्टींचा तुमच्या केसांवर परिणाम होत असतो. Hair Care Tips in Marathi How many time you can wash you hair

केस निरोगी Strong Hair रहावे यासाठी केस धुताना अनेक गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे. केस गळणे Hair Fall किंवा कोंडा होणे यासाठी तुम्ही केसांची स्वच्छता कशी घेताय हे देखील महत्वाचं असतं.

काहीजण वारंवार केस धुणं पसंत करतात तर केस वारंवार धुतल्याने Hair Wash जास्त गळू शकतात असा अनेकांचा समज असल्याने काहीजण आठवड्यातून एकदाच केस धुतात. मात्र नेमके केस किती वेळा धुणं गरजेचं आहे आणि ते धुवत असताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात. 

किती वेळा केस धुणं गरजेचं

केसांची स्वच्छता किंवा केस धुणं हे खरं तर तुमची लाइफस्टाइल आणि कामाचं स्वरुप यावरही अवलंबून असतं. साधारणपणे आठवड्यातून २ किंवा ३ वेळा केस धुणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला जास्त घाम येत असल्यास त्या व्यक्तीला दिवसाआड केस धुण्याची गरज भासू शकते. 

अनेकदा घाम आणि धुळीमुळे देखील केसाची मुळं कुमकुवत होवून केस गळती होवू शकते. याशिवाय काही इतर गोष्टी पाहता प्रत्येक व्यक्तीसाठी केस धुण्याच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतात. 

हे देखिल वाचा -

केसांची निगा
Hair Fall : पातळ केसांचा वैताग आलाय? या 5 गोष्टी लावल्याने पुन्हा सुरू होईल केसांची वाढ

जर केसांमध्ये खाज येत असेल किंवा स्काल्प चिकट होवून खाज येत असेल तर एक दिवसआड केस धुवावेत.

तसंच जर तुम्ही होममेड, नैसर्गिक किंवा माइल्ड शॅम्पूचा वापर करत असाल तरीही तुम्ही वरचेवर केस धुवू शकता. 

मात्र जर तुम्ही केमिकलयुक्त किंवा सल्फेट आणि हार्ड शॅम्पू वापरत असाल तर आठवड्यातून २ वेळाच केस धुवा. 

तसंच केसांत कोंडा होत असल्यास तुम्हाला दिवसाआड किंवा आठवड्यातून ३-४ वेळा केस धुणं गरजेचं आहे. 

याशिवाय जर तुम्हाला घाम येत असेल किंवा तुम्ही सतत धुळीच्या संपर्कात येत असाल, तसंच कामाच्या ठिकाणी धूर किंवा केमिकल्सशी संपर्क येत असल्यास सौम्य शॅम्पूने दिवसाआड केसं धुणं गरजेचं आहे. 

तुम्ही दूरच्या प्रवासावरून आला असाल तर लगेच दुसऱ्या दिवशीही तुम्ही केस धुवू शकता. 

केस धुताना घ्यायची काळजी

हार्ड शॅम्पूचा वापर टाळा- केस धुण्यासाठी कधीही अँटीडँड्रफ किंवा सल्फेटयुक्त शॅम्पूचा वापर टाळावा. या शॅम्पूच्या अतिवापरामुळे केसातील नैसर्गिक तेल कमी होवू लागतं. यामुळे केस निस्तेज दिसू लागतात. 

यासाठीच सल्फेट फ्रि सौम्य शॅम्पूने केस धुवावे. शक्य असल्यास रिठा, शिकाकाई असा नैसर्गिक घटकांपासूव तयार करण्यात आलेले होममेड किंवा आयुर्वेद शॅम्पू केस मजबूत राहण्यास मदत करतील. 

गरम पाण्याचा वापर टाळावा- केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळावा. गरम पाण्यामुळे केस ड्राय होतात आणि केसांचा गुंता वाढतो. थंड वातावरणात कोमट पाण्याने केस धुवावेत. गार पाण्याने केस धुणं हा उत्तम पर्याय आहे. 

हे देखिल वाचा-

केसांची निगा
Hair Growth Tips : वातावरण बदलाने केस होतात जास्तच Damage; हे हेअरमास्क वापरून तर पहा!

केस योग्यरित्या कोरडे करा- केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने ते जोरात पूसू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता जास्त असते. केस पुसण्यासाठी कायम सुती कापड किंवा मायक्रोफायबरचा वापर करा. 

तसंच बराच वेळ केसांना कापड गुंडाळून ठेवू नका. केवळ ४-५ मिनिटांसाठी कापड गुंडाळून त्यानंतर केस मोकळे सोडून कोरडे होवू द्यात. तसंच ओले केस लगेचच बांधू नका. 

कंडिशनरचा वापर- आठवड्यातून एकदा तरी केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करा. यामुळे केसांमधील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते.

अशा प्रकारे केसांनी निगा राखत असताना केस स्वच्छ आणि योग्य वेळी धुणं अत्यंत गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com