Hair Dye Allergy: तुम्हाला केसांना कलर केल्याने अ‍ॅलर्जी होते का? हे उपाय करून मिळवा आराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Dye Allergy

Hair Dye Allergy: तुम्हाला केसांना कलर केल्याने अ‍ॅलर्जी होते का? हे उपाय करून मिळवा आराम

आता सध्या सगळ्याच वयोगटातील लोकांमध्ये हेअर कलर करून घेण्याची क्रेझ खूपच वाढली आहे. बहुसंख्य लोकं वेगवेगळ्या रंगानी आपले केस कलर करून घेतात, किंवा हेअर डायचा वापर करतात.

परंतु या हेअर डायमध्ये आणि हेअर कलर्समध्ये हानिकारक रसायने असतात जे तुमचे केस खराब होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. हेअर डायमध्ये आणि हेअर कलर्स वापर केल्याने केस सुंदर आणि आकर्षक दिसू लागतात. मात्र, त्यांचा वारंवार वापर केल्याने केसांचे नुकसान होते आणि तुम्हाला त्वचेची अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते.

तुम्हाला माहिती का ?

केसांवर वारंवार हेअर डाय किंवा हेअर कलर वापरल्यामुळे तुमच्या टाळूच्या त्वचेला अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते. यामुळे डोक्याच्या टाळूवर खाज सुटते, टाळूच्या भागावर लालसरपणा येतो, तसेच संपूर्ण डोक्यावर कोरडेपणाचे येऊ शकतो.कधी कधी तर मानेच्या आणि चेहऱ्याच्या त्वचेवर खाज येण्याची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे ज्यांची त्वचा संवेदनशील आहे. त्यांनी डाय किंवा हेअर कलरचा अतिवापर करणे टाळावे.

चला तर मग आता जाणून घेऊया जास्त प्रमाणात हेअर डाय केल्याने त्वचेवर काय लक्षणे दिसू लागतात आणि हे टाळण्यासाठीच्या काही खास टिप्स

हेही वाचा: Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी पाच प्रभावी आयुर्वेदिक उपाय

अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी टिप्स:

1) स्टाइलक्रेझमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तुम्हाला हेअर डाय किंवा हेअर कलर लावल्याने टाळू किंवा मान, कान, कपाळावर खाज सुटणे किंवा लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही कोरपडीचा गर (अ‍ॅलोवेरा जेल) वापरू शकता. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोरपडीच्या वापर केल्याने त्वचेशी संबंधित जळजळ, सूज, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

2) मध वापरल्याने हेअर कलरमुळे होणारी त्वचेची ऍलर्जी देखील दूर होऊ शकते. मधामध्ये असलेले काही गुणधर्म पुरळ, जळजळ शांत करतात. यासाठी निर्जंतुक कापसावर चमचा मध घ्या आणि पुरळ असलेल्या भागावर ठेवा. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा.

हेही वाचा: मुलींनो, Long Hair हवेत! आहारात करा या Vitamins चा समावेश

3) ऍलर्जी झालेल्या जागेवर जोजोबा तेल लावा.

जोजोबा तेलात अँटी-इंफ्लामेटरी आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म असतात. हे तेलामुळे जळजळ, जखमा, पुरळ, खाज या सगळ्या समस्येवर मात करण्यासाठी मदत करू शकते. यसाठी एक चमचा जोजोबा तेलात थोडे ऑलिव्ह ऑईल घाला आणि गरम करा. हे मिश्रण प्रभावित भागात आणि टाळूवर लावा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी केस आणि टाळू स्वच्छ धुवा.

4) खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, तिळाचे तेल, टी ट्री ऑईल देखील टाळूवर आणि प्रभावित त्वचेवर लावल्यास लालसरपणा, जळजळ, खाज, सूज यासारख्या समस्या कमी होतील. कारण त्यांच्यात अँटी-इंफ्लामेटरी, वेदनशामक गुणधर्म असतात

Web Title: Hair Dye Allergy Are You Allergic To Hair Dye Get Relief By Doing This Remedy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..