Benefits Of Lemongrass : स्ट्रेसमुळे त्रस्त आहात ? गवतीचहा आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ फायदे

आयुर्वेदामध्ये गवतीचहाचे अनन्य साधारण महत्व सांगण्यात आले आहे.
Benefits of Lemongrass
Benefits of Lemongrass esakal
Updated on

आपल्या सर्वांची सकाळ ही चहाने होते. चहा पिल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. कुणाला आलं घातलेला चहा आवडतो, तर कुणाला गवतीचहा घातलेला चहा आवडतो. गवतीचहा हा आपल्या चहाची फक्त चव वाढवत नाही तर, तो अनेक पारंपारिक खाद्यपदार्थांची ही चव वाढवतो.

आयुर्वेदामध्ये गवतीचहाचे अनन्य साधारण महत्व सांगण्यात आले आहे. अनेक पारंपारिक खाद्यपदार्थांमध्ये आणि औषधांमध्ये गवतीचहाचा आवर्जून वापर केला जातो. गवतीचहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होतात. गवतीचहामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश असतो.

गवतीचहामध्ये झिंक, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन B अशा अनेक पोषणमूल्यांचे विपुल प्रमाण आढळते. या गवतीचहाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर मग आज, आपण गवतीचहाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

गवतीचहाचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

वजन नियंत्रीत करण्यास करते मदत

आपले शरीर डिटॉक्सिफाय करण्यामध्ये गवतीचहा महत्वाची भूमिका बजावते. तसेच, गवतीचहामध्ये असलेल्या सायट्रलचा वापर लठ्ठपणावर उपचार आणि लठ्ठपणा रोखण्यासाठी दीर्घकाळापासून केला जात आहे. वजन कमी करण्यासाठी रोज गवतीचहा घातलेला चहा पिणे हे लाभदायी ठरते.

Benefits of Lemongrass
Health Care: लिंबासोबत 'या' गोष्टींचे सेवन करणे पडेल महागात, जाणून घ्या

पचनक्षमता सुरळीत ठेवण्यास सहाय्यक

गवतीचहामध्ये आढळून येणाऱ्या रासायनिक घटकांमुळे ते आपली पचनक्षमता सुरळीत ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, पोटाला सूज येणे आणि इतर पचनाच्या समस्या दूर करण्यास गवतीचहा मदत करते.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

गवतीचहा आपल्या शरिरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे, हृदयविकार आणि इतर संबंधित आजारांना दूर ठेवले जाऊ शकते. त्यामुळे, ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी गवतीचहा अवश्य प्यायला हवा.

ताण-तणाव कमी करते

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना कामाच्या व्यापामुळे इतर कारणांमुळे, ताण-तणावाची समस्या जाणवते. ही समस्या दूर करण्यामध्ये गवतीचहा मदत करू शकते. गवतीचहामध्ये अ‍ॅंटीडिप्रेसंट गुण आढळतात, जे चिंता आणि ताण-तणावाला दूर ठेवण्यात सहाय्यक ठरते. तसेच, आपली मानसिक शक्ती वाढवण्यात गवतीचहा मदत करतो.

Benefits of Lemongrass
Green Peas Health Benefits : मधुमेह आणि त्वचेसाठी लाभदायी आहे मटार; जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com