काहीही करा पण, लठ्ठपणा होत नाही कमी! जाणून घ्या कारणे| Research Over Obesity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Obesity problem
काहीही करा पण, लठ्ठपणा होत नाही कमी! जाणून घ्या कारणे| Research Over Obesity

काहीही करा पण, लठ्ठपणा होत नाही कमी! जाणून घ्या कारणे

लठ्ठपणा (obesity) कमी करण्याठी अनेकजण विविध उपाय करतात. काही लोक जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करून आरोग्यावर (Health) लक्ष देतात. तर काही जण गरम पाणी पितात. इतकेच नाही तर जेवण (Food) सोडून सॅलेड खाण्यावर भर देतात. पण असे करूनही वजन कमी होत नाही. उलट अधिक मानसिक, शारीरिक त्रास होतो. पण, लठ्ठपणा तुमच्या जनुकांमध्ये असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. लंडनमध्ये झालेल्या संशोधनात (Research) शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की 74 अनुवांशिक म्यूटेशनमुळे (74 genetic mutations) तुम्हाला लठ्ठपणाचा धोका संभवतो. म्हणजेच लठ्ठपणा हा केवळ व्यायामाचा अभाव किंवा अति खाण्याने होतो असे नाही. संशोधन स्पष्टपणे सांगते की चांगला आहार घेतल्यास लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा: वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग फायद्याचा! जाणून घ्या नवा प्रकार

obese person will have more risk

obese person will have more risk

संशोधनातील दावा (Study Result)

किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या शास्त्रज्ञांनी (King College London scientists) रक्तातील प्रमुख रेणूंच्या (Molecules) पातळीचे निरीक्षण केले. यात जीवनसत्वे आणि अमीनो एॅसिडचा समावेश होता. हे अन्न पचल्यावर सोडले जातात. या संशोधनातून अनुवांशिक लठ्ठपणा कमी करण्याचे संकेत संशोधकांनी दिले आहेत. संशोधनात, किंग्ज कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी डीएनएचे आणखी डझनभर भाग शोधले आहेत, जे शरीराच्या चयापचयवर परिणाम करतात. ते वजन कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. या दरम्यान ७४ नव्या अनुवांशिक क्षेत्र वजनाशी जोडलेले नाहीत. त्यामुळे काही लोक लठ्ठ असण्याची शक्यता का असते हे काही अंशी स्पष्ट होऊ शकते. पण तज्ज्ञांनुसार, लठ्ठपणा पौष्टिक आहाराने कमी केला जाऊ शकतो. आकडेवारीनुसार यूके मधील सुमारे 35 दशलक्ष प्रौढांचे वजन जास्त आहे. त्याच वेळी, अमेरिकेतील 70 दशलक्ष प्रौढांना लठ्ठ मानले जाते. लठ्ठपणामुळे कर्करोग, टाइप 2 मधुमेह आणि हृदयविकारासह अनेक आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

हेही वाचा: पाणी पुरी,भेळ खा! वजन घटवा

increased Obesity

increased Obesity

या कारणांमुळे वाढतोय लठ्ठपणा (Reasons of Obesity)

तुम्ही अयोग्य आहार(Food) घेत असाल तर लठ्ठपणा येऊ शकतो. फास्ट फूड खाणे, खूप मद्यपान करणे, नियमित बाहेरचे खाणे या गोष्टी कारणीभूत आहेत. याशिवाय आपल्या जीवनशैलीत शारीरिक हालचालींचा अभाव वाढत आहे. एका दिवसात जितके जास्त कॅलरी जळतात त्यापेक्षा जास्त कॅलरी खाल्ल्यानंतर तुम्ही वाढवता. अनुवांशिकतेमुळेही तुम्हाला लठ्ठपणा येऊ शकतो. या संशोधनात काही पुरावे मिळाले आहेत की लठ्ठपणा जनुकांमध्ये . याशिवाय वैद्यकीय कारणांमुळेही लठ्ठपणा येतो. यामध्ये जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर तुमचा लठ्ठपणा वाढतो.

हेही वाचा: Weight loss: व्यायाम न करता वजन कमी करायचयं? कसे ते वाचा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top