esakal | मीठाच्या पाण्याने करा आंघोळ अन् दूर करा ११ शारीरिक समस्या!

बोलून बातमी शोधा

मीठाच्या पाण्याने करा आंघोळ अन् दूर करा ११ शारीरिक समस्या!

मीठाच्या पाण्याने करा आंघोळ अन् दूर करा ११ शारीरिक समस्या!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

पदार्थ रुचकर व्हावा असं वाटत असेल तर त्यात मीठाचं योग्य प्रमाण गेलंच पाहिजे. जर एखाद्या पदार्थामध्ये मीठ जास्त झालं तर तो पदार्थ हमखास बिघडतो. त्यामुळे मीठ जरा जपूनच वापरावं असं म्हटलं जातं. मीठामुळे शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होते. त्यामुळे आहारात मीठ असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे मीठ केवळ पदार्थाची चवच वाढवत नाही तर त्यामुळे अनेक शारीरिक फायदेदेखील होतात. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीमध्ये मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. म्हणूनच मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.

१. मीठाच्या पाण्याने आंघळ केल्यास थकवा दूर होतो.

२. त्वचेचा पोत सुधारतो.

३. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होते.

हेही वाचा: चायनीज पदार्थात मीठ जास्त पडलं? ६ पद्धतीने करा कमी

४. मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रंग उजळतो.

५. घामाची दुर्गंधी दूर होते.

६. घामामुळे आलेला चिकटपणा कमी होतो

७. शरीरावरील मळ निघतो.

८. शरीरावरील मृत त्वचा निघून जाते.

९. एखादा विषारी किडा चावल्यास विषप्रभाव कमी होतो.

१०. मानसिक ताण कमी होतो.

११ नखे व हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.