Metabolism Booster: सकाळी उपाशी पोटी 'या' गोष्टी खाल्ल्याने बूस्ट होईल मेटाबॉलिजम! जाणून घ्या

Metabolism Booster: सकाळी उपाशी पोटी 'या' गोष्टी खाल्ल्याने बूस्ट होईल मेटाबॉलिजम! जाणून घ्या

Metabolism वाढवायचा आहे? सकाळी उपाशी पोटी खा हे पदार्थ

निरोगी शरीर हवे असेल तर शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी असणे महत्वाचे ठरते. निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहारासोबतच योग्य वजन राखणेही आवश्यक आहे.

प्रत्येकाला निरोगी राहायचं असतं. त्यामुळे प्रत्येकजण योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करतो. पण अनेकजणांना प्रश्न पडतो की सकाळी उपाशी पोटी काय खावे? सकाळी उठल्याबरोबर आपल्या शरीराला लगेच ऊर्जेची गरज असते.

यामुळे सकाळचा आहार नेहमी पोषक असणे, गरजेचे आहे. सकाळचा आहार उत्तम असला की दिवस उत्तम जातो. याशिवाय पोटाच्या समस्या किंवा पचनशक्ती तसेच मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर योग्य आहार घेणे, गरजेचे आहे.

मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर खालील पदार्थ खा

1. खजूर

जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात खजुरांनी करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल तसेच तुमचा मेटाबॉलिजम वाढवण्यात प्रभावी ठरू शकेल. खजूर हे इन्स्टंट एनर्जी फूड आहेत.अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी देखील हे प्रभावी सिद्ध होऊ शकते.

2. मनुका

भिजलेला मनुका रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. रोज मनुका खाल्ल्याने पचनाच्या समस्यांवर मात करता येते. मनुकामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे भिजवून खाल्ल्याने अनेक फायदे होतात, ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून संरक्षणसुद्धा करु शकता. भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरातील कर्करोगही टाळता येतो.

Metabolism Booster: सकाळी उपाशी पोटी 'या' गोष्टी खाल्ल्याने बूस्ट होईल मेटाबॉलिजम! जाणून घ्या
Winter Diet: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी 'हे' पदार्थ खा; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच शरीरालाही उबदार ठेवा

3. भिजवलेले बदाम

दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणे उत्तम आहे. भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमचा मेटाबॉलिजम वाढतोच सोबत तुम्हाला सकाळी सकाळी ऊर्जा मिळते तसेच पोटाच्या अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या असेल तर दररोज सकाळी भिजवलेले बदाम खा.

4. पपई

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पचनक्रिया सुधारण्यासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी पपई हे खूप फायदेशीर मानले जाते.

मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे चांगले आहे, कारण त्यात पोट साफ करणारे गुणधर्म आहेत

5. सब्जा 

सब्जा तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. सब्जा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, कारण त्यामध्ये अत्यावश्यक अमीनो ॲसिड असतात, जे मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी ने भरलेले असतात. मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी तुम्ही सब्जाचे सेवन देखील करू शकता. सब्जा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com