Increase Appetite: जर तुम्हालाही भूक लागत नसेल तर 'या' गोष्टींचे करा पालन

Increase Appetite: सततचा तणाव, चिंता, नैराश्य किंवा बद्धकोष्ठता या समस्या भूक न लागण्याचे मुख्य कारण असू शकते.
Increase Appetite:
Increase Appetite: Sakal
Updated on

Increase Appetite: अनेकांना भूक लागली असते पण जेवायला वाटत नाही. तुमचा आवडता पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर असतो तरीसुद्धा खावे वाटत नाही. भूक न लागण्याचे एख मुख्य कारण म्हणजे तणावात असणे. डॉक्टरांच्या मते भूक न लागण्यामागे बद्धकोष्ठता हे देखील कारण असू शकते. पण जर तुम्ही निरोगी असाल आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले कामामुळे तणाव वाढतो. तुम्ही जर योग्य आहार गेत नसाल तर अनेक आजार उद्भवू शकतात. यामुळे भूक वाढवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

भूक न लागण्याचे कारण 

तणाव, चिंता, नैराश्य, बद्धकोष्ठता किंवा कोणताही गंभीर आजार ही भूक न लागण्याची प्रमुख कारणे मानली जातात. आहारतज्ज्ञाच्या मते आधी तुमच्या शरीराकडे आणि तुमच्या दिनचर्येकडे काही बदल होत आहेत का ते पहावे. सतत तणाव असतो का? ताप, कर्करोग, जुनाट यकृत रोग, मूत्रपिंड समस्या, भूक कमी होणे यासह अनेक मानसिक कारणे आहेत. एवढेच नाही तर तुम्ही वारंवार जेवण टाळत असाल आणि सतत थकत असाल तर हे देखील भूक न लागण्याचे कारण असू शकते. तज्ज्ञ सांगतात की शरीरातील सततचा ताण आणि हार्मोनल बदल हे देखील भूक न लागण्याचे कारण असू शकते. भूक न लागण्याचा परिणाम फक्त तुमच्या मनावर होत नाही तर त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेपासून त्वचेवर आणि नखांवर दिसून येतो. एवढेच नाही तर बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे पावसाळ्यात भूकही मंदावते.

भूक वाढवण्यासाठी काय करावे

रसाळ फळांचे सेवन करावे

भूक वाढवण्यासाठी रसाळ फळांचे सेवन करावे. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, ई, बीटा कॅरोटीन आणि सेलेनियम युक्त फळांचे सेवन करावे. रसाळ आणि लिंबूवर्गीय फळे शरीरातील पचनसंस्था वाढविण्यास मदत करतात.  

योगा करावा 

तज्ज्ञांच्या मते भूक वाढवण्यासाठी शरीराला सक्रिय ठेवणे गरजेचे असते. यासाठी योगा करावा, सायकल चालवावी, चालायला जावे यासारख्या गोष्टी कराव्या. यामुळे तुम्हाला फ्रेश देखील वाटेल आणि भूक देखील वाढेल.

निरोगी लाईफस्टाइल

आपल्या आहारात निरोगी आहाराचा समावेश करा. झोपण्यापूर्वी जेवणात सकस आहाराचा समावेश करा. यामुळे शरीराला कुपोषणापासून वाचवता येते, दिवसातून किमान 3 वेळा चांगले पदार्थ खावे आणि प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले 2 ते 3 निरोगी स्नॅक्स घ्यावे. एवढेच नाही तर जंक फूडचे सेवन टाळावे.

फळांचा रस


जर तुम्हाला सतत भूक कमी वाटत असेल तर हेल्दी ड्रिंक्स सर्वोत्तम आहे. यामुळे शरीराला डिहायड्रेशनपासून संरक्षण मिळते आणि पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. यासाठी तुम्ही डाळिंबाचा रस, लिंबूपाणी, केळीचा शेक पिऊ शकता.तसेच दही, ताक आणि लस्सीचे सेवन करणे आरोग्यदायी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com