Health Care News : पीसीओएसची समस्या आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून रहाल दूर! रोज करा ही योगासने

PCOS चा त्रास कमी करण्यासाठी ही योगासने आहेत बेस्ट..
Health Care News : पीसीओएसची समस्या आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून रहाल दूर! रोज करा ही योगासने

पॉलीसिस्टिक ओव्हेरीज सिंड्रोम (PCOS) हा स्त्रियांमधील जीवनशैलीशी संबंधित सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. या आजारात हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे वजन वाढते, मासिक पाळी अनियमित होते, चेहऱ्यावर केसांची वाढ होऊ लागते. यामध्ये अंडाशयात लहान गाठी तयार होतात.

यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. या आजारात लठ्ठपणा आणि मधुमेह वाढण्याचीही शक्यता असते. तंदुरुस्त राहण्यासाठी, दररोज काही वेळ व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही योग आसनांबद्दल सांगत आहोत, जे PCOS मुळे वाढणारी पोटाची चरबी कमी करू शकतात.

चक्रासन

हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक आहे; नियमित सरावाने पोटाची अतिरिक्त चरबी कमी करता येते. याशिवाय चक्रासन कंबर आणि बाजूची चरबी कमी करण्यास मदत करते. चक्रासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी इतके शक्तिशाली आहे की तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसून येईल.

Health Care News : पीसीओएसची समस्या आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून रहाल दूर! रोज करा ही योगासने
Health Care News : तुम्हीही तणावात आहात का? स्ट्रेस फ्री राहायचंय तर करा हे सोपे उपाय

उष्ट्रासन

हे आसन करताना आपल्या पाठीचा कणा वाकतो, तोच भाग वाकवताना जास्त ताणू नका. इतर योगासनांप्रमाणे, उष्ट्रासन हे देखील सकाळी केले जाते. सकाळी व्यायाम करणे अधिक फायदेशीर असते.

भुजंगासन

भुजंगासन किंवा कोब्रा पोझ हा सूर्यनमस्काराचा एक भाग आहे. हे पोटावर झोपून, शरीराचा वरचा भाग उचलून आणि मान वर करून केले जाते. हे आसन तुमच्या पोटाचे स्नायू तसेच तुमच्या पाठीला ताणते. यामुळे शरीराची लवचिकता सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

बालासन

बालासन हे PCOS साठी सर्वात फायदेशीर आसनांपैकी एक मानले जाते कारण ते मज्जासंस्थेला शांत आराम देते. हे संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण सुधारून पीरियड क्रॅम्प आणि PCOS ची लक्षणे सुधारते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com