esakal | व्हिटामिन B7 च्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकते 'ही' समस्या; वेळीच घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

व्हिटामिन B7 च्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकते 'ही' समस्या

व्हिटामिन B7 च्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकते 'ही' समस्या

sakal_logo
By
शर्वरी जोशी

शरीराच्या योग्य वाढीसाठी आपल्या आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच ज्या पदार्थांमधून व्हिटामिन (vitamin), प्रोटिन, कॅल्शिअम मिळेल असेच पदार्थ आपल्या आहारात हवे. सध्याच्या काळात आपल्याला व्हिटामिन सी चं मुबलक प्रमाणात सेवन केलं पाहिजे हे साऱ्यांनाच माहित आहे. परंतु, व्हिटामिन A,B,C सोबतच B7 देखील शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर B7 ची कमतरता असेल तर अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. म्हणूनच, B7 च्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात ते जाणून घेऊयात. (health-health-news-problems-due-to-deficiency-of-vitamin-b7-in-body)

'या' कारणामुळे निर्माण होते B7 ची कमतरता -

अँटीबायोटिक व अँटी सीजर सारख्या औषधांचा अतिरेक वापर केल्यामुळे B7 ची कमतरता निर्माण होऊ शकते. तसंच धुम्रपान, मद्यपान करणे यामुळेदेखील हे व्हिटामिन कमी होऊ शकतं.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

B7 च्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या

१. B7 च्या कमतरतेमुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते.

२. त्वचेवर सतत खाज येणे व त्वचा लालसर होणे.

३. नखे कमकुवत होणे. परिणामी, नखं लवकर तुटतात.

४. केसगळणे, केस पातळ होणे.

५. अशक्तपणा येणे.

६. थकवा जाणवणे.

७. मानसिक ताण निर्माण होणे.

८. डोळ्यांची समस्या निर्माण होणे. डोळे लाल होणे.

९. निद्रानाश होणे.

१०. रक्ताची कमतरता निर्माण होणे.

हेही वाचा: निराधार! मुलांनी पाठ फिरवल्यानंतर वृद्धावर आली 'ही' वेळ

B7 साठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

शरीरातील B7 ची कमतरता भरुन काढण्यासाठी आहारात पालक, दूध, सुकामेवा, सुर्यफुलाच्या बिया, चॉकलेट, अंड्याचा पिवळा बल्क, दही, ओटमील, केळी,बीन्स, ब्रोकोली, सफरचंद,रताळं, पनी या सारख्या पदार्थांचा समावेश करावा.