esakal | दररोज कॉर्नफ्लेक्स खाताय तर वेळीच थांबा!
sakal

बोलून बातमी शोधा

दररोज कॉर्नफ्लेक्स खाताय तर वेळीच थांबा!

दररोज कॉर्नफ्लेक्स खाताय तर वेळीच थांबा!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

दररोज सकाळच्या नाश्त्याला कोणते नवनवीन पदार्थ करायचे हा प्रश्न अनेक गृहिणींसमोर असतो. त्यामुळे अनेकदा स्त्रिया मुलांना कॉर्नफ्लेक्स खायला देतात. गेल्या काही काळात मुले आणि वयस्क व्यक्तींमधील कॉर्नफ्लेक्स खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला सर्रास कॉर्नफ्लेक्स पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ग्राहकांची वाढती मागणी पाहता बाजारातदेखील वेगवेगळ्या फ्लेव्हर्स आणि कंपन्यांचे कॉर्नफ्लेक्स उपलब्ध असल्याचं दिसून येतं. मात्र, वारंवार कॉर्नफ्लेक्स खाल्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच, कॉर्नफ्लेक्स खाण्याचे दुष्परिणाम कोणते ते पाहुयात. (health-news-corn-flakes-side-effects-for-health)

१. ग्लायसेमिक इंडेक्सचं अतिप्रमाण -

दररोज कॉनफ्लेक्स खाल्ल्यामुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीज होण्याची शक्यता अधिक असते. कॉर्नफ्लेक्स खाल्ल्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स हाय होतं. कॉन फ्लेक्समध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण 81+6 किंवा 81-6 इतकं असतं. ग्लायसेमिक इंडेक्सला १०० गुणांमध्ये कॅल्युलेट केलं जातं. त्यानुसार, ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण ५५ पेक्षा कमी असणं फायदेशीर आहे. परंतु, या प्रमाणात वाढ झाली तर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा: कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती; महिन्याला 69 हजार पगार

२. पोषणमूल्यांची कमतरता -

सध्याच्या काळात अनेक जण वजन कमी करण्यासाठी कॉर्नफ्लेक्स खातात. परंतु, कॉर्नफ्लेक्समुळे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. तसंच त्याच्याच पोषणमूल्यांची मात्रदेखील शून्य टक्के असते. एक कप कॉर्न फ्लेक्समध्ये १०१ कॅलरी, २४ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २६६ मिलीग्रॅम सोडिअम असतं. तसंच अनेक कॉर्न फ्लेक्समध्ये सिरप आणि वनस्पती तेल मिक्स केलेलं असतं.

३. कॉर्न सिरप आणि स्वीटनर -

कॉर्न फ्लेक्समध्ये गोडवा आणि फ्लेवर आणण्यासाठी अनेकदा त्यात सिरप आणि स्वीटनरचा वापर केला जातो. ज्यामुळे वजनासोबत रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. कॉर्न फ्लेक्सची चव वाढवण्यासाठी सोडिअम गरम केलं जातं आणि त्यात कॉर्न सिरप आणि स्वीटनर मिक्स केलं जातं.

loading image