esakal | प्लाझ्मा डोनेट करताय? मग महत्त्वाच्या 10 गोष्टी माहीत असायला हव्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Plasma

प्लाझ्मा डोनेट करताय? मग महत्त्वाच्या 10 गोष्टी माहीत असायला हव्यात

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या अनेक कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमेडिसवीर यांची कमतरता जाणवत आहे. या सगळ्यासोबतच सध्या अनेक रुग्णांची रक्तद्रवासाठी म्हणजेच प्लाझ्मासाठीदेखील दमछाक होत आहे. प्लाझ्मा हा कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी महत्त्वाचा भाग ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या अनेकांना प्लाझ्मा डोनेट करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या अनेकांनी आयसीयूमध्ये भरती असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान केला असून त्यांचे प्राण वाचवले आहेत. परंतु, प्लाझ्मा दान करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

प्लाझ्मा थेरपीसाठी प्रथम डोनेट करणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये रक्त तपासणी केली जाते. तुमच्या रक्तात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला नाहीये ना हे तपासलं जातं. यामध्ये जर व्यक्तीला शुगरचा त्रास, एचआयव्ही, हेपेटाइटीस या समस्या नसतील तर त्याच्या रक्तातून प्लाझ्मा घेण्यात येतो.

प्लाझ्मा नेमकं कशाप्रकारे काम करतो

कोरोनाग्रस्त व्यक्तीवर उपचार केल्यानंतर त्याच्या रक्तात अॅटीबॉडीज तयार होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा अन्य कोरोनाग्रस्ताला दिला तर त्या व्यक्तीला कोरोनावर मात करण्यास मदत मिळते. प्लाझ्मामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

प्लाझ्मा कोणी दान करावा

१. कोरोनावर मात केलेले व्यक्ती.

२. कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर १४ दिवसांनी प्लाझ्मा दान करता येऊ शकतो.

३. व्यक्तीचं आरोग्य सुदृढ हवं.

४. १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात.

हेही वाचा: 'कोरोना से डर नही लगता साहब..'; तरुणाने दाखवली कोविड सेंटरची दुरावस्था

या व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करु शकत नाहीत.

१. ५० किलोपेक्षा कमी वजन असलेले.

२. गर्भवती स्त्रिया.

३. इन्शुलिन घेत असलेले मधुमेही व्यक्ती

४. रक्तदाब १४० पेक्षा अधिक असलेले.

५.कर्करोगावर मात केलेले.

६. हृदय, फुफ्फुस यांचा जुनाट आजार

loading image