Health Survey : जेवणात जास्त मीठ खाणाऱ्यांना होऊ शकतो कॅन्सर?; व्हिएन्ना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा अहवाल

जास्त मीठ खाणाऱ्या लोकांसमोर हा सर्व्हे वाचून दाखवा
Health Survey :
Health Survey :Esakal

Healthy Survey :

काही लोकांना मुळातच मीठ जास्त खाण्याची सवय असते. जेवणात कितीही मीठ असलं तरी वरून चमचाभर मीठ घेतल्याशिवाय त्यांना जेवल्यासारखं वाटतंच नाही. पण अशा लोकांना आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात.

बिपी असलेल्या लोकांना मीठ खाणे बंद करण्यास सांगितले जाते. मात्र तरीही ते ऐकत नाहीत. तर, अशावेळी त्या लोकांना व्हिएन्ना विद्यापीठातील संशोधकांनी केलेला सर्व्हे वाचून दाखवा. कारण, यात असे म्हटले आहे की, जास्त मीठ खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. 

Health Survey :
Cancer Therapy : राष्ट्रपतींनी लाँच केली स्वदेशी CAR-T सेल थेरपी, आता कर्करोगावरील उपचार होणार सुलभ

होय तुम्हालाही धक्का बसला असेल ना. तर हे खरं आहे. काय आहे या संशोधकांचा अभ्यास, त्यांनी हा सर्व्हे कसा केला याबद्दल अधिक माहीती घेऊयात.

व्हिएन्ना युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने अलीकडील यावर अभ्यास केला आहे. ब्रिटनमधील जे लोक वारंवार त्यांच्या जेवणात मीठ घालतात त्यांना पोटाचा कर्करोग होण्याचा अधिक असतो. तर जे लोक कमी मीठ खातात त्यांच्या तुलनेत हा धोका ४१ टक्के जास्त असतो.

Health Survey :
साडी कॅन्सर म्हणजे काय? कुणाला होऊ शकतो साडी कॅन्सर? | Saree Cancer

चीन, जपान आणि कोरियामध्ये पूर्वीच्या संशोधनाने अधिक मीठ खाण्याचा संबंध पोटाच्या कॅन्सरशी जोडला होता. हा सर्व्हे निरीक्षणात्मक असला तरी, पूर्वीच्या संशोधनाने असे सूचित केले आहे की जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने पोटाच्या संरक्षण करणारे अस्तर कमकुवत होऊ शकते.

पोटाचे अस्तर कमकुवत झाल्याने परिणामी आतड्याचे, शरीरातील ऊतींचे नुकसान होते. आणि त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकते.

व्हिएन्ना विद्यापीठातील पोषणतज्ञ आणि या संशोधनाच्या प्रमुख सेल्मा क्रॉनस्टीनर-गिसेविक, यांनी सांगितले की, आम्ही केलेले संशोधन हे पाश्चिमात्य देशातील लोकांची अधिक मीठ खाण्याची सवय आणि पोटाचा कॅन्सर याचा थेट संबंध आहे हे दर्शवते.

FDA (Food and Drug Administration) ने एखादा पदार्श मानवी शरीरात किती प्रमाणात गेला पाहिजे, याबद्दल स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, दररोज 2,300 mg सोडियम पेक्षा जास्त मीठ खाऊ नये, जे साधारण एक टेबल स्पून इतके आहे.

Health Survey :
Tata Cancer Memorial: टाटा हॉस्पिटलच्या कर्करोग सेंटरचे वसई येथे उद्‍घाटन! कर्करोगावर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

अतिरिक्त मीठ घालण्याच्या सवयीमुळे, एजन्सीच्या अहवालानुसार, सरासरी अमेरिकन साधारणपणे दररोज सुमारे 3,400 mg मीठ खातत. उदाहरणार्थ, कॅम्पबेलच्या चिकन नूडल सूपच्या एका कॅनमध्ये अंदाजे 890 mg मीठ असते.

तोंडाला चव यावी म्हणून तुम्ही थोडे मीठ खाऊच शकता. पण त्याचा अतिरेक झाला तर मात्र कॅन्सर होण्यापासून बचाव होऊ शकत नाही.

Health Survey :
Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा आजार बळावणार; २०४० पर्यंत लाखो महिलांचा होणार मृत्यू, The Lancet च्या सर्ह्वेत दावा

या अभ्यासासाठी संशोधकांनी यूके बायोबँकच्या डेटाचे विश्लेषण केले, ज्यामध्ये युनायटेड किंगडममधील 471,144 प्रौढांचा समावेश होता.हा अभ्यास साधारण 11 वर्ष सुरू होता. या काळात त्यांना असे आढळून आले की जे लोक वारंवार त्यांच्या जेवणात मीठ घालतात त्यांना पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता 41 टक्के जास्त असते

मद्यपान आणि धूम्रपान केल्याने पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता खूप वाढते. असे अमेरिकन कॅन्सर सोसायटीने म्हटले आहे. 2024 मध्ये यूएसमध्ये पोटाच्या कर्करोगाची सुमारे 26,890 नवीन प्रकरणे आढळून येतील, ज्यामध्ये सुमारे 10,880 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com