Health Tips: व्हायरल फिव्हरमध्ये लगेच खाऊ नका औषध, लवकर बरे होण्यासाठी करा 'हे' उपाय

हवेतील आर्द्रता आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव हे देखील रोग पसरण्याचे कारण
fever
fever esakal

पाऊस आणि हवामान यांच्यामुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इंफेक्शन झपाट्याने पसरत असतात. हवेतील आर्द्रता आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव हे देखील रोग पसरण्याचे कारण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्हायरल इन्फेक्शन्सची सुरुवात मुख्यतः घसा खवखवणे इथूनच होते. यासोबतच नाक गळणे, ताप, खोकला, हातपाय गळणे अशी लक्षणेही दिसून येतात. संसर्गाची सुरुवातीची लक्षणे दिसताच तुम्ही आवश्यक ती काळजी घेतल्यास तुम्ही लवकर बरे होऊ शकता. जाणून घ्या.

सुरवातीला करा हे उपाय

हे विषाणू मुख्यतः नाकातून शरीरावर हल्ला करतात. यानंतर ते घशात मग वरच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. शरीरात पोहोचून ते मल्टीप्लाय होऊन तुम्हाला आजारी बनवतात. शिंक आली, अशक्तपणा जाणवला किंवा थोडासा घसा खवखवल्यासारखे वाटत असेल तर सर्वप्रथम कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. जर तुमच्याकडे बीटाडीन गार्गल असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता. त्यानंतर वाफ घ्या. औषधांचा विषाणूवर परिणाम होत नाही, त्यामुळे अँटिबायोटिक्स घेऊ नका किंवा कोणत्याही गोळ्या घेऊ नका.

तापासाठी लगेच औषध घेऊ नका

जर तुम्हाला ताप आला असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढत आहे. शरीर गरम झाल्यावर विषाणू नष्ट होतात. तापमान वाढवून संसर्ग वाढण्यापासून रोखण्याचा हा शरीराचा मार्ग आहे. त्यामुळे ताप कमी करण्यासाठी लगेच कोणतेही औषध घेऊ नका. तापमानात ९९ फॅरेनहाइट वाढ होणे हा ताप मानला जात नाही. १०० पेक्षा जास्त तापमान ताप म्हणून गणले जाते. जर तुमचे टेम्परेचर १०० च्या वर जात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तापाचे औषध घ्या अथवा थोडा वेळ जाऊ द्या.

fever
पावसाळ्यात लहान मुलांना हे आजार होऊ शकतात?

या गोष्टी खा

झिंक, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी व्हायरस कमकुवत करतात. आपण मल्टीविटामिन घेऊ शकता. त्यांचे नैसर्गिक स्त्रोत घेणे चांगले होईल. तुम्ही उन्हात बसू शकता, सुका मेवा खाऊ शकता आणि व्हिटॅमिन सी असणारी फळे खाऊ शकता. घसा दुखत असेल तर आंबट फळे, दही आणि सोडायुक्त पेये घेऊ नयेत. कोमट पाणी आणि मध घ्या. भरपूर पाणी प्या. हलका आहार घ्या आणि विश्रांती घ्या. ग्रीन टी देखील घेऊ शकता. मुळेथी हे नॅचरल अँटी व्हायरल मानले जाते. तुम्ही चहा, गरम पाणी किंवा ग्रीन टीमध्ये टाकून मुलेठी घेऊ शकता. गरम सूप, गरम पेय आणि अधिक प्रथिने घ्या. झोपताना हळद, काळी मिरी टाकून दूध घ्या. झोपण्यापूर्वी गरम पाण्यानी गुळण्या करा.

fever
ताप आल्यावर खाऊ नका हे पदार्थ; प्रकृती अधिक बिघडेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com