Healthy Morning Tips: सकाळची सुरूवात या गोष्टी खाऊन कराल तर देवही म्हणतील, दिर्घायुषी भवं!

ड्रायफ्रूट्स खाल्ल्याचे होतात हे फायदे
Healthy Morning Tips
Healthy Morning Tipsesakal
Updated on

Benefits of Dry Fruits : शरीर निरोगी आणि चांगलं ठेवण्यासाठी व्यक्तीनं ड्रायफूट्सचं सेवन करायला हवं, असा सल्ला अनेकदा डॉक्टर्स देत असतात. घरातील लहान मुलं किंवा वयोवृद्ध वडिलधारी मंडळी जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांना सुद्धा ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

सकाळी सर्वप्रथम काय खावे? हा प्रश्न तुमच्याही मनात कायम असेल तर आम्ही त्याचे उत्तर येथे देणार आहोत. निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या दिवसाची सुरुवात चांगली केली पाहिजे, आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.(A Healthy Start to Your Day Discover the Right Way and Benefits of Eating 4 Dry Fruits)

अनेक वेळा लोक सकाळी उठतात आणि बराच वेळ काहीही खात नाहीत. किंवा दिवसाची सुरूवात मैद्याची बिस्कीटं खाऊन करतात. जे आरोग्यासाठी चांगले नसते. तुमच्या दिवसाची सुरुवात बदाम, अंजीर, मनुका आणि अक्रोडाने करा. हे ड्रायफ्रुट्स रात्री भिजत ठेवा आणि सकाळी खा.

Healthy Morning Tips
Monsoon Food : पावसाळ्यात 'भुट्टा' खाण्याचे फायदे माहितीयेत

ड्रायफूट्समध्ये असलेल्या विविध आवश्यक पोषकतत्वांमुळं व्यक्तीला रोगप्रतिकारशक्ती मिळण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील कॉलेस्ट्रॉलचीही पातळी नियंत्रणात राहते. परंतु ड्रायफूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती आहे किंवा त्याचे काय आरोग्यदायी फायदे आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.

ड्रायफूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

दररोज सकाळी ड्रायफूट्स खाणं हे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. त्यासाठी काजू आणि बादाम रात्री भिजवायला ठेवून त्याचं सकाळी सेवन केलं तर त्याचे आरोग्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळत असतात. त्यामुळं सकाळी अक्रोड, बदाम किंवा तुम्हाला जे आवडतं त्याचं मिश्रण करून तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ शकता. (Healthy Food

ड्रायफ्रुट्स कसे खावेत

हे ड्रायफ्रूटमध्ये असलेले फायटिक ऍसिड नष्ट करते. जे पौष्टिकतेचे सेवन रोखू शकते. एकत्र भिजवल्याने कोरड्या फळांचा प्रभाव थंड होतो आणि ते गरम होत नाहीत. आपण ते सकाळी खाऊ शकता, जेणेकरून संपूर्ण दिवस एनर्जी टिकून राहील. चला जाणून घेऊया दिवसभरात कोणते ड्रायफ्रूट खावे आणि त्याचे फायदे काय आहेत?(Dry Fruits)

Healthy Morning Tips
Dry Fruit For Summer : उन्हाळ्यासाठी बेस्टम् बेस्ट आहेत हे ड्रायफ्रूट्स, शरीराला ठेवतील थंडगार!

हे आहेत ते पदार्थ जे तुम्हाला अमरत्व देतील

बदाम

दिवसाची सुरुवात भिजवलेल्या बदामाने करावी. 4 ते 6 बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी सोलून खा. भिजवलेले बदाम खाल्ल्याने फायदे होतात, त्यात असलेले पोषक तत्व शरीराला मिळतात.

ज्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. यासोबतच बदामामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, त्यामुळे ते खाल्ल्याने त्वचेची समस्या उद्भवत नाही. बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

मनुके

रिकाम्या पोटी 5 ते 6 भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला लोह मिळते, यासोबतच शरीर डिटॉक्स होते. मनुके रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पचनाच्या समस्याही दूर करतात. मनुका खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.

अक्रोड

2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम मिळते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. यासोबतच अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

Healthy Morning Tips
Wet Shoes Drying Tips : पावसाळ्यात ओले शूज सुकवण्याची डोकेदुखी करा दूर; हा जुगाड झकट्यात सुकवेल तुमचे शूज

अंजीर

भिजवलेले अंजीर सकाळी खावेत. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही आणि पचनक्रियाही निरोगी राहते.

ड्रायफ्रूट खाण्याचा मोठा फायदा या लोकांना

सुक्या मेवाचं सेवन करणं हे मधुमेहानं त्रस्त असलेल्या लोकांसाठी प्रचंड फायदेशीर असतं. त्यामुळं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर अक्रोड आणि बदाम मुक्त रॅडिकल्स दूर करण्यास मदत करतात. त्यामुळं शरीरातील पेशींचे नुकसान होत नाही.

भिजवलेले काजू खाल्यानं त्यामुळं तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे, अशा लोकांना दररोज सकाळी ड्रायफूट्सचं सेवन करायला हवं. त्यासाठी पिस्ता आणि अक्रोडचं सेवन करणं सर्वात उपयोगी मानलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com