Wet Shoes Drying Tips : पावसाळ्यात ओले शूज सुकवण्याची डोकेदुखी करा दूर; हा जुगाड झकट्यात सुकवेल तुमचे शूज

आज आपण ओले शूज लवकर सुकवण्याची सोपी ट्रिक जाणून घेऊयात
Wet Shoes Drying Tips
Wet Shoes Drying Tipsesakal

Wet Shoes Drying Tips : पावसाळ्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतात. पण पावसाळ्यात आणखी एक डोकेदुखी वाढते, ती म्हणजे पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत तसेच ओले शूजपण सुकायला बराच वेळ लागतो. या ऋतूत अनेकदा रस्त्यांवर पाणी साचते, अनेक वेळा छत्रीशिवाय घराबाहेर पडताना शूज पूर्ण भिजतात आणि अनेक दिवस उन नसल्याने शूज वाळत नाहीत, त्यातून उबट वास येतो. आज आपण ओले शूज लवकर सुकवण्याची सोपी ट्रिक जाणून घेऊयात.

मान्सूनमध्ये ओले सूज कसे सुकवाल?

१) फॅनखाली शूज सुकवा

अनेक दिवस सूर्यप्रकाश नसताना, ओले शूज सुकवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पंखा वापरणे. सर्वात आधी तुम्ही लेसेस काढा आणि इनसोल काढा आणि शूजसह छताच्या पंखाखाली ठेवा, जर तुम्हाला लवकर सुकायचे असेल तर या गोष्टी टेबल फॅनसमोर ठेवा आणि पंखा फूल स्पीडमध्ये चालू ठेवा.

Wet Shoes Drying Tips
अतरंगी फॅशन; Wet जीन्सचा ट्रेंड पाहून हसू होईल अनावर!

२) हेअर ड्रायर वापरा

केस ड्रायर केस सुकवण्यासाठी वापरले जाते, परंतु त्याच्या मदतीने आपण ओले शूज देखील सुकवू शकता. शूजच्या आतील भागाने तुम्ही हेअर ड्रायर फिरवा जेणेकरून तुमचे शूज लवकर सुकतील. हेअर ड्रायर फिरवताना ते शूजच्या थोडे दुरून फिरवा जेणेकरून हेअर ड्रायच्या हिटने तुमचे शूज खराब होणार नाहीत. (Monsoon)

Wet Shoes Drying Tips
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग या टिप्स नक्की फॉलो करा Monsoon Travel

3) कागदाची मदत घ्या

टिश्यू पेपर किंवा जुन्या वर्तमानपत्रांच्या मदतीने ओले शूज सुकवले जाऊ शकतात. सर्व प्रथम, हा कागद शूजमध्ये भरून घ्या आणि शूजमधील पाणी शोषण्याचा प्रयत्न करा. ही अॅक्टिव्हिटी परत रिपीट करा. ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. जेव्हा ओलावा जवळजवळ निघून जातो, तेव्हा सामान्य खोलीच्या तापमानातही ते सहज कोरडे होईल. (Lifestyle)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com