Helmet Expiry Date & Safety Guide: When Should You Replace It?
esakal
Helmet expiry date and replacement rules: बाईक किंवा स्कूटी चालवताना हेल्मेट हा आपल्या सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पण, अनेक लोक एकदा हेल्मेट खरेदी केल्यानंतर ते वर्षानुवर्षे वापरत राहतात. जोपर्यंत हेल्मेट वरून नीट दिसते, तोपर्यंत ते बदलण्याची गरज नाही असा बहुतेकांचा समज असतो. पण, फक्त बाहेरून चांगले दिसणे म्हणजे ते सुरक्षित असणे नाही!
काळानुसार हेल्मेटची आतील पॅडिंग, फिटिंग आणि फॉर्म कमकुवत होतो. अशा वेळी अपघात झाल्यास जुने हेल्मेट डोक्याला पूर्ण सुरक्षा देऊ शकत नाही. जुने हेल्मेट का बदलावे आणि हेल्मेटची एक्सपायरी कशी ओळखावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-