उन्हाळ्यासाठी वापरा ही पाच महत्त्वाची फॅब्रिक

Here are five important fabrics to use for summer kolhapur news
Here are five important fabrics to use for summer kolhapur news

कोल्हापूर : मागील वर्षी कोरोण्याच्या प्रभावामुळे आपण सर्वजण घरामध्ये बंदिस्त होतो.  तब्बल एक वर्षाने आता थोडी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यास थोडी मुभा मिळाली आहे. यंदा उन्हाची तीव्रता वाढली आहे.त्यामुळे कपड्यांमध्ये फॅशन करत असताना सजग राहिले पाहिजे. अशा वेळी अशा फॅब्रिक्सचा विचार करा जे गरमी पासून बचाव करेल.या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा पाच फॅब्रिक विषयी माहिती देणार आहोत जे तुम्हाला या समर सीजन पासून बचाव होण्यासाठी  मदत करेल.

ऑरगॅनिक कॉटन

संपूर्ण जगामध्ये कॉटन हे फॅब्रिक खूप प्रसिद्ध आहे कारण ते आरामदायक आहे. गर्मी पासून बचाव होण्यासाठी हे फॅब्रिक महत्त्वाचे काम करते. मात्र या पासून कापड तयार होत असताना पर्यावरणाची खूप हानी होत असते. यामुळेच फॅशन जगतामध्ये पारंपारिक कॉटन ऐवजी ऑरगॅनिक कॉटन चा वापर केला जात आहे. एका संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की ऑरगॅनिक कॉटन तयार करण्यासाठी ९० टक्के पाण्याची कपात होते. शिवाय कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन ४६ टक्के होते. यामध्ये रासायनिक सामग्री आणि कीटकनाशकांचा वापर नाकी बरोबर होतो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि ऑरगॅनिक कॉटन  वापरण्यास हलके असते. ज्याला तुम्ही पारंपरिक कॉटन सारखा सुद्धा वापरू शकता.

लिनेन

वाढत्या तापमानामध्ये कॉटन नंतर जर कोणी गरमी कमी करण्यासाठी मदत करत असेल तर ते आहे लिनेन. लिनेन गर्मीमध्ये होणाऱ्या घामाला पूर्णपणे सुखावते. योग्य डिझाईन आणि कलर ची निवड केल्यास आपण लिनेन पार्टी, फॉर्मल तसेच कॅज्युअल लुकमध्ये सुद्धा करून वापरू शकतो.

चाम्ब्रे

चाम्ब्रे हा पातळ आणि हलका फॅब्रिक आहे. जो डेनियम सारखा दिसतो. हे कापड साध्या विणकामा  पासून तयार केले जाते. याला बनवण्यासाठी धाग्यांना एकमेकात गुंतवावे  लागते. जे क्रिस क्रॉस बनवते. या कपड्यापासून ट्राउझर्स, शर्ट, जॅकेट, आणि खूप वेगळ्या प्रकारचे आऊटफिट तयार केले जातात. डेनियम प्रेमींसाठी उन्हाळ्याच्या दिवसात ऑप्शन ठरू शकतो. याच बरोबर कॉटन जर्सी हे असे फॅब्रिक आहे जे उन्हाळ्यामध्ये ट्राऊझर साठी खूप महत्त्वाचे मटेरियल ठरेल.

खादी

खादी हे भारताच्या भावनांशी जोडलेले एक फॅब्रिक आहे. या फॅब्रिक ला स्वदेशी आंदोलनापासून खूप लोकप्रियता मिळाली आणि आजही हे फॅब्रिक अनेक जण पसंत करतात. खाद्यी या फॅब्रीक ला हाता पासून बनवल्या जाते. त्यामुळे इतर फॅब्रिक च्या तुलनेने याचे महत्त्व जादा आहे. खादी तयार करत असताना कॉटन फायबर आणि सिल्कचा वापर केला जातो. पारंपरिक वेशभूषा मध्ये खादी ही लोकप्रिय मानली जाते. पण वेळेच्या बदलावा मुळे अनेक कंपनीने यामध्ये खूप प्रयोग  करत इंडो वेस्टरन फ्युजन तयार केले आहेत. फॅशन इंडस्ट्री कोणत्याही डाउट शिवाय खादीचा वापर आता करू लागली आहे. आणि जादा तर लोक खादि ला आता पसंती देत आहेत.

सिल्क

रेशीम सर्वात महागड्या कपड्यांपैकी एक आहे. रेशीम त्याच्या अभिजात आणि सोईमुळे चांगलेच पसंत केले आहे.इतिहासात राजा-राजवाड्याच्या  फक्त रेशीम वस्त्रांचा  वापर होत असे. उन्हाळ्यात रेशीम थंड होते, ज्यामुळे वाढत्या तापमानासह मागणी वाढते. काही वर्षांपूर्वी रेशीम फक्त रेशीम किड्यांमधून तयार केले जात होते. परंतु इको-प्रेमी आणि शाकाहारी फॅब्रिकची वाढती मागणीने फॅशन उद्योगाला रेशीम मिळविण्यासाठी नवीन पद्धती लागू करण्यास भाग पाडले.अलिकडच्या काळात, सेंद्रिय रेशीममध्ये असलेले आगमनी मारले जात नाही, परंतु ते पूर्णपणे तयार असतात आणि फुलपाखरूच्या रूपात उड्डाण करतात. त्यानंतर, रेशम कोकूनपासून तयार केला जातो (ज्यामध्ये रेशीम किटक रेशीम तयार करतात). रेशीमचे हे पर्यावरण-अनुकूल रूप मुख्य प्रवाहात येऊ शकलेले नाहीत, परंतु  फॅशन उद्योग योग्य दिशेने जाऊ लागला आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com