Weight Loss : हिमेश रेशमियाने 'या' डाएटमुळे ६ महिन्यात कमी केलं २० किलो वजन

हिमेश रेशमिया वेगवेगळ्या कारणाने कायम चर्चेत असतो.
Weight Loss
Weight Loss esakal

Himesh Reshammiya Weight Loss Diet Plan : प्रसिद्ध गायक, संगितकार हिमेश रेशमिया कायमच कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. कधी गाण्यासाठी, आवाजासाठी, कधी लग्नामुळे तर कधी आपल्या फीटनेसमुळे कायम चर्चेत असतो. सध्या त्याने ज्या वेगात आपले वजन कमी केले आहे, त्यासाठी त्याने नेमकं कोणतं डाएट फॉलो केलं याची चर्चा रंगत आहे.

हिमेशने काही दिवसांपूर्वी आपलं बरंच वजन कमी केलं होतं. ज्यामुळे त्याची पर्सनॅलिटी अधीक खुलून आली. द एक्स्पोज या सिनेमासाठी हिमेशने साधारण ६ महिन्यात २० किलो वजन कमी केलं. कारण या सिनेमात त्याचे अॅब्ज दाखवण्यात येणार होते. एवढ्या वेगात वजन करण्यासाठी हिमेशच्या पत्नीने खास त्याच्यासाठी डाएट प्लॅन बनवलं होतं. ज्यात तिने ऑर्गॅनिक फूड वाढवून प्रोसेस्ड फूड पूर्णपणे काढून टाकलं होतं.

Weight Loss
Weight Loss : रात्रीच्या जेवणाची वेळ ठरवते वजन कमी होणार की नाही!

हिमेशचे फीटनेस रुटीन आणि डाएट

  • हिमेशने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याने ६ महिन्यात आपलं ट्रांसफॉर्मेशन केलं होतं.

  • तो रात्री ८.३० नंतर काहीही खात नव्हता.

  • दुपारी ३ वाजेनंतर कार्ब्ज नाही तर फक्त प्रोटीन फूड खात होता.

  • आइस्क्रिम आणि चॉकलेट बिलकूल खात नव्हता.

  • पण रविवार चीट डे होता.

Weight Loss
Weight Loss Tips: अशा प्रकारे सफरचंद खाल्ले तर झपाट्याने कमी होईल वजन
  • हिमेशस्वतः शाकाहारी आहे. पण प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी त्याने अंडे खाणं सुरू केलं होतं.

  • प्रोटीनसाठी प्रोटीन शेक, पनीर, टोफू, अंडे, डाळी, राजमा यांचा आहारात समावेश वाढवला.

  • ४५ मिनीट वर्क आउट करत होता.

  • आठवड्यातून ५ दिवस वेट ट्रेनिंग करत होता. आणि १ दिवस कार्डीओ

  • याशिवाय पूर्ण झोपेची विशेष काळजी घेत असत ज्यामुळे बॉडी रिकवरीला मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com