Bhang Effects: पहिल्यांदाच भांग पिताय? मग जाणून घ्या शरीरात कोणते बदल दिसतात

Bhang After Effects: भांग प्यायल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
Bhang After Effects
Bhang After EffectsDainik Gomantak

holi 2024 What changes are seen in body after drinking bhang

देशभरात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा होळी 24 मार्चला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्माचा या सणाला खुप महत्व आहे. या दिवशी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात.

या दिवशी रंगांव्यतिरिक्त विविध पदार्थ खाण्याची मज्जा देखील असते. होळीच्या निमित्ताने अनेक प्रकारचे पदार्थांचा आस्वाद घेता येतो. पुरणपोळी, गुजिया, बर्फी तसेच होळीच्या दिवशी लोक मोठ्या आवडीने भांग पितात. भांग पिल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसतात. तुम्हीही पहिल्यांदाच भांग पित असाल शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घ्या.

  • भुक वाढणे

भांग प्यायल्यानंतर शरीरात सर्वात पहिला होणार बदल म्हणजे भूक वाढणे होय. यामुळे व्यक्ती सतत काहीना काही पदार्थ खात राहतो. पण जास्त खाल्लामुळे पोट खराब होऊ शकते.

  • चक्कर येणे

अनेक लोक होळीच्या दिवशी भांग पिण्याचा प्लॅन करतात. पण भांग प्यायल्यावर चक्कर येऊ शकते. तुम्हाला डोक्यात फिरल्यासारखे वाटू शकते.

Bhang After Effects
Side Effects Of Raita: 'या' समस्या असल्यास रायता खाणे टाळा, अन्यथा होऊ शकतो खुप त्रास
  • मुडस्वींग होणे

भांग प्यायल्यानंतर एखादी व्यक्ती एकतर सतत हसत राहतो किंवा रडत राहतो. यामुळे भांग प्यायल्यानंतर हा एक बदल दिसून येतो.

  • स्मृती भ्रंश होणे

होळीला अनेक लोक मोठ्या आवडीने भांग पितात. भांग प्यायल्यानंतर काही लोकांना स्मृती भ्रंशाची समस्या जाणवू शकते. लोकांना अनेक गोष्टींचा विसर पडतो.

  • खुप झोप येणे

भांग प्यायल्यानंतर व्यक्तीला आळस आणि सुस्ती येते. परिणामी त्या व्यक्तीला खुप झोप येते. भांग प्यायल्यानंतर अस्वस्थता वाटू लागते. तसेत अनेक लोकांना थकवा जाणवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com