
Holi Festival : होळी खेळताना रंग डोळ्यांत गेल्यास काय कराल ?
मुंबई : होळी हा आनंदाचा सण आहे. होळीच्या दिवशी उत्साहाच्या भरात रंग लावताना तो आपल्या डोळ्यांत जातो. त्यामुळे डोळ्यांना खूप वेदना होतात. होळीच्या वेळी अनेकांच्या बाबतीत असे घडले असावे. ( What to do if colour gets into your eyes while playing Holi)
अनेकदा आपण होळीच्या दिवशी त्वचेची काळजी घेतो पण डोळ्यांची काळजी घ्यायला विसरतो. रंगामुळे अनेकांना अॅलर्जीचाही सामना करावा लागतो. यंदाच्या होळीला मात्र रंग डोळ्यात गेल्यास नीट काळजी घ्या. हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
डोळ्यांभोवती तेल लावा (Holi Festival)
होळी खेळायला जाण्यापूर्वी डोळ्यांच्या भोवती तेल लावा. यामुळे रंग पटकन डोळ्यात जाणार नाही आणि गेला तरी रंग काढणे सोपे होईल.
डोळे धुवू नका
चुकून डोळ्यात रंग गेला तर अनेकजण पाण्याने डोळे धुतात. असे करू नये. असे केल्याने रंग पूर्ण डोळ्यात पसरतो आणि ते अधिक धोकादायक ठरू शकते. यासाठी आय क्लीनर वापरल्यास रंग सुलभपणे बाहेर येईल.
डोळे चोळू नका
कधी कधी रंगामुळे डोळ्यात जळजळ होते. अशा वेळी चुकूनही डोळे चोळू नका. असे केल्याने रंग डोळ्यात सर्वत्र पसरतो. डोळ्यात रंग गेल्यास सुती कापडाच्या साहाय्याने डोळे स्वच्छ करा.
होळी खेळताना काळजी घ्यावी
होळी खेळताना आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, रंग खरेदी करताना हे लक्षात ठेवा की केमिकलयुक्त रंग खरेदी करू नका, कारण अशा प्रकारच्या रंगांमुळे तुम्हाला त्वचा आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.