
Home Made Colors : केमिकल रंगांमूळे होळीची भिती वाटतेय? मग घरीच बनवा होळीचे रंग!
वर्ष सुरू झाल्यापासून तरूण मंडळी ज्या सणाची वाट पाहतात तो होळीचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. होलिका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. या सणासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. विविध रंग, पिचकारी यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.
कितीही केमिकल विरहीत होळी साजरी करायची म्हटली तरीही रंगांमध्ये केमिकल घातलेच जाते. साधे वाटणाऱ्या रंगांमूळेही त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामूळे होळीचे प्लॅन कॅन्सल करणारे अनेक लोक आहेत. तूम्हालाही होळीची भिती वाटत असेल तर केमिकल विरहीत रंग घरच्या घरीच बनवा. ते कसे बनवायचे हे पाहुयात.
तूम्हाला या वर्षी काहीतरी नवीन करायचे असेल तर होळीच्या दिवशी स्वतःचे रंग स्वत:च बनवा. चला जाणून घेऊया तुम्ही घरच्या घरी फुलांपासून विविध रंगांचे गुलाल कसे बनवू शकता.
जास्वंदीचा लाल रंग
जास्वंद हे फुल गणपती बाप्पाचे फेवरेट आहे. त्यामूळे गणेश चतूर्थीच्या काळात ते फुल कसे दिसते हे आपण पाहिले असेल. या फुलाला अनेक रंग असतात. सध्या अनेक रंगांचे जास्वंद आपल्याला पहायला मिळतात. या फुलापासून तूम्हाला हवा असलेला लाल, पिवळा, गुलाबी असे रंग तूम्ही बनवू शकता.
जास्वंदाची फुले धुवून उन्हात नीट वाळवावीत. पूर्ण सुकल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पावडर तुम्ही मैद्यात कींवा कोणत्याही पीठात मिसळून रंग बनवू शकता.
गुलाब
होळीत सर्वांचा आवडता लाल रंग बनवायचा असेल तर लाल गुलाबाच्या पाकळ्या उन्हात वाळवा. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. आता या पावडरमध्ये एक चपातीचे पीठ मिसळा. तुमचा गुलाबाचा सुगंधित नैसर्गिक रंग तयार आहे.
गुलमोहर
गुलमोहराच्या फुलापासून केशरी रंग बनवणे अगदी सोपे आहे. गुलमोहराच्या झाडाला असंख्य फुलं लागतात. त्यामूळे तूम्हाला केशरी रंग बनवण्यासाठी अनेक फुलं उपलब्ध होतील. त्यासाठी गुलमोहराची फुले उन्हात सुकवून त्याची पावडर बनवा. या पावडरीत कोरडे पीठ मिक्स करा.
झेंडू
झेंडूची फुले बाजारात सहज उपलब्ध होतात. होळीच्या पूजेला वापरलेली फुलेही तूम्ही रंग बनवण्यासाठी वापरू शकता. झेंडूच्या पाकळ्या काढून उन्हात चांगल्या वाळवा. फुले चांगली सुकल्यावर ती बारीक करून घ्या. त्या पावडरीत पीठ मिक्स करून रंग तयार करा.
बिट
बिटाचा वापर आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्यामूळे नैसर्गिक रंग बनवतानाही बिटाचा वापर करणे फायद्याचे ठरेल. यासाठी बिटाचा रस काढून तो पाण्यात मिक्स करा. त्यामूळे पाण्याचा रंग बनवता येईल.