Dandruff Treatment : अँटी डँड्रफ शॅम्पू वापरूनही केसात परत कोंडा होतोय? हे ३ उपाय ठरतील बेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dandruff Treatment

Dandruff Treatment : अँटी डँड्रफ शॅम्पू वापरूनही केसात परत कोंडा होतोय? हे ३ उपाय ठरतील बेस्ट

Home Remedies for Dandruff : पाण्यातला बदल, सकस अन्नाची कमतरता आणि जीवनशैलीतला बदल यामुळे केसात कोंडा ही समस्या बहुतेकांना जाणवते. ही समस्या फक्त स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही आढळून येते. कितीही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरा, केसातला कोंडा तात्पूरता कमी होतो आणि केसही कोरडे होतात. मग पुन्हा जैसे थे.

Dandruff Treatment

Dandruff Treatment

जर तुम्हीही यामुळे त्रस्त असाल तर हे ३ उपाय यावर नक्कीच गुणकारी ठरतील. जाणून घेऊया

खोबरेल तेल

हिवाळ्यात केसांना खोबरेल तेलाची गरज वाढते. खोबरेल तेलात ताजे कोरफड मिसळा आणि मिश्रण एका भांड्यात गरम करा. हे मिश्रण टाळूवर लावा. लक्षात ठेवा की मिश्रण फार गरम नसावे कारण ते तुमच्या टाळूला इजा करू शकतील. रात्रभर केसांवर राहू द्या. सकाळी उठून केस धुवा.

हेही वाचा: Dandruff Remove : हे' उपाय कराल कर केसातील कोंडा होणार झटक्यात गायब

Dandruff Treatment

Dandruff Treatment

कडुलिंबाचा पाला

कोरफडच्या ताज्या जेलसोबत कडुलिंबाच्या पानांचा वापर करणे हा कोंड्यावर खात्रीशीर उपाय आहे. कडुलिंबाची पाने पाण्यात बारीक करून त्यात कोरफडीचे जेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर अर्धा तास राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. त्याचा फरक तुम्हाला दिसेल.

हेही वाचा: Winter Hair Dandruff : हिवाळ्यात केसामध्ये खूप कोंडा होत असेल तर 'हे' उपाय करून बघा...

Dandruff Treatment

Dandruff Treatment

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरा

मेथीच्या दाण्यांमध्ये सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून लावल्यानेही कोंड्यावर परिणाम दिसून येतो. मेथी दाणे रात्रभर भिजवून ठेवल्यानंतर सकाळी बियांची पेस्ट बनवा. त्यात सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. हे मिश्रण केसांवर काही वेळ राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. तुम्हाला पेस्टचा प्रभाव दिसेल.

टॅग्स :hairHair Care