Dandruff Remove : हे' उपाय कराल कर केसातील कोंडा होणार झटक्यात गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dandruff Remove

Dandruff Remove : हे' उपाय कराल कर केसातील कोंडा होणार झटक्यात गायब

Dandruff Remove : केसांमध्ये प्रत्येक व्यक्तीचं सौंदर्य दडलेलं असतं. त्यामुळे केसांची काळजी घेणेही तितकचं गरजेचं असतं. योग्य प्रकारे केसांची काळजी घेतली तर केसाचं आरोग्यही जपता येतं पण हल्ली बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपण केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय. त्यामुळे केसगळती किंवा केसांमध्ये कोंडासारख्या समस्या दिसून येतात. (how to remove dandruff try these home remedies )

सर्वात जास्त केसात कोंडा (Dandruff) हा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो. केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो.

तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी अनेक केमिकलयुक्त कॉस्मेटीक प्रोडक्टसचा वापर करतो, यामुळे सुद्धा कोंडा होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Ber Fruit : महागडी फळं खाण्यापेक्षा बोरं खा अन् ग्लोइंग स्कीन मिळवा

जर तुम्ही काही घरगुती उपाय ट्राय केले तर तुम्ही केसातील कोंडा घालवू शकता.

1.लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. ३ ते ४ लिंबू घ्या व त्यांची साले काढून त्यांना जवळ जवळ अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनटासाठी उकळवा.

त्यानंतर पाणी थंड झाल्यावर हा पाणी आठवड्यातून २ वेळा आपल्या केसां मध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.

2.कडुलिंब ची पाने बारीक वाटून घेवून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा.

हेही वाचा: Hair Oil Tips : हिवाळ्यात केसांना कोमट तेल लावण्याचे काय आहोत फायदे?

3.तुळशीची पाने व आवळ्याची पावडर पाण्यामध्ये मिळवा आणि याचा लेप बनवा आणि या लेपाने आपल्या केसांची मालिश करा. अर्ध्या तासासाठी असेच ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या.

4.खोबरेल तेलही कोंड्यावर फारच गुणकारी आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा.

- डॉ. अमित भोरकर

न्युट्रीशिअनीस्ट अणि डायटेशिअन