Gray Hair ने चिंताग्रस्त आहात? मग करा हे घरगुती उपाय...

केस पांढरे होणं टाळण्यासाठी कमीत कमी केमिकल्स असलेल्या प्राॅडक्टची निवड करणं गरजेचं आहे. शक्य तेव्हा नैसर्गिक हेअर मास्क किंवा तेलांचा आणि हेअर वॉशचा वापर करावा. त्याचप्रमाणे पोषक आहार देखील तितकाच गरजेचा आहे
पांढऱ्या केसांसाठी उपाय
पांढऱ्या केसांसाठी उपायEsakal

एक काळ असा होता की पांढरे केस म्हणजे वाढत्या वयाचं एक लक्षण होतं. मात्र अलिकडे अगदी लहान मुलांपासून तरुणांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होवू लागले आहेत. ही समस्या आता सामान्य बनू लागली आहे. काही वेळेस ही समस्या अनुवांशिक असते. Home Remedies in Marathi to avoid gray hair

अलिकडे बदललेली जीवनशैली Lifestyle, पोषक तत्व नसलेला आहार आणि प्रदूषण देखील यासाठी कारणीभूत आहेत.  तसचं केमिकल असलेल्या हेअर प्रोडक्टमुळे देखील अकाली केस पांढरे Gray Hair होण्याची समस्या वाढू लागली आहे. 

पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी अनेकजण हेअर कलर Hair Colour किंवा हेअर डायचा वापर करतात. मात्र यामुळे फक्त काही दिवसांपुरते केस काळे होतात. शिवाय या डाय आणि कलरमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असल्याने केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठीच घरगुती उपायांच्या मदतीने केस काळे करणं हा उत्तम पर्याय आहे. Grey Hair Problem

काही नैसर्गिक पदार्थांच्या आणि वस्तूंच्या मदतीने अकाली सफेद झालेले केस काळे करणं शक्य आहे. यामुळे केसांवर दुष्परिणाम देखील होणार नाही. हे उपाय कोणते आहेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

केस काळे करण्यासाठी तुम्हाला लागणारा महत्वाचा बेस घटक आहे तो म्हणजे नारळाचं तेल. घाण्याचे नारळ तेल वापरणं हा अधिक चांगला पर्याय आहे. कारण हे तेल पूर्णपणे नैसर्गिक असतं. 

हे देखिल वाचा-

पांढऱ्या केसांसाठी उपाय
Long Hair: दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत!,मग हे नैसर्गिक उपाय करून पहाच

नारळ तेल आणि मेंदी- मेदी अगदी नैसर्गिकरिच्या तुमचे पांढरे केस कलर करण्यासाठी उपयोगी पडेल. यासाठी मेहदीचा योग्य प्रकारे वापर करणं गरजेचं आहे. हे तेल बनवण्यासाठी काही मेहदीची पानं उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर नारळाच्या तेलात ही पानं टाकून तेल चांगलं तापवत ठेवा. 

पानांचा रंग तेलात पूर्णपणे उतरल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल गार होवू द्या. त्यानंतर हे तेल केसांना चांगल्या प्रकारे लावा आणि २-३ तासांसाठी राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा आणि वाळू द्या. या तेलाचा रिझल्ट तुम्हाला लगेचच दिसेल. Get rid from white hair 

नारळाचे तेल आणि आवळा- आवळा त्वचेसोबतच केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी आणि आयरन मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. आवळ्याचं तेल तयार करण्यासाठी तुम्ही आवळा पावडरचा वापर करू शकता. 

नारळाच्या तेलात आवळा पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा. हा हेअरमास्क केसांना साधारण अर्धा तास राहू द्या. त्यानंतर केस स्वछ पाण्याने धुवा. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. तसचं केसांना पुरेसं पोषणंही मिळेल. 

नारळाचे तेल आणि कडीपत्ता- अकाली पांढरे होणाऱ्या केसांसाठी कडीपत्ता हा एक चांगला उपाय आहे. यासाठी १२-१५ कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून वाळवून घ्यावी. त्यानंतर २ चमचे नारळाचं तेल तापत ठेवा.  यात कडीपत्त्याची पानं टाकून एक उकळी घ्या. त्यानंतर गॅस बंद करून तेल गार होवू द्या. Curry leaves and coconut oil for white hair

कडीपत्त्याच्या या तेलाने केसांना चांगलं मसाज करा. २ तास तेल केसांना राहू द्या. त्यानंतर एखाद्या हर्बल शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून २ वेळा या तेलाने मसाज केल्यास परिणाम दिसून येईल. 

नारळ तेल आणि तुरटी- पांढरे केस काळे करण्यासाठी तुरटी आणि नारळाचं तेल उपयुक्त ठरू शकतं. यासाठी नारळाच्या तेलामध्ये तुरटीची पावडर मिस्क करावी. या तेलाने केसांना मसाज करून काही वेळ तेल राहू द्यावं. त्यानंतर केस स्वच्छ धुवावे. 

यामुळे केसांमध्ये कोलेजन बूस्ट करण्यासाठी आणि केस काळे करण्यासाठी मदत होईल. नारळाच्या तेलामुळे केसाचा रंग टिकून राहण्यास मदत होते. या तेलाचा वापर केल्याने कोंडा दूर होण्यासही मदत होते.

या नैसर्गिक उपांसोबतच केस पांढरे होणं टाळण्यासाठी कमीत कमी केमिकल्स असलेल्या प्राॅडक्टची निवड करणं गरजेचं आहे. शक्य तेव्हा नैसर्गिक हेअर मास्क किंवा तेलांचा आणि हेअर वॉशचा वापर करावा. त्याचप्रमाणे पोषक आहार देखील तितकाच गरजेचा आहे. 

हे देखिल वाचा-

पांढऱ्या केसांसाठी उपाय
Hair Care : केसांमध्ये घाम येण्याची कारणे आणि उपाय

अलिकडे केसांच्या समस्यांमध्ये वेळेआधीच टक्कल पडणं ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. केवळ पुरुषांमध्येच नव्हे तर महिलांमध्ये देखील केस विरळ होवुन टक्कल पडणं किंवा कपाळावरील केस कमी होणं अशा समस्या दिसू लागल्या आहेत. एक काळ असा होतो की केवळ वयाच्या पन्नाशीनंतर टक्कल पडण्यास सुरुवात होत. त्यामुळे वयाचा अंदाजही बांधता येत होता. मात्र आता अगदी तरुण वयातच टक्कल पडण्याची समस्या निर्माण होवू लागली आहे. 

केस गळती किंवा लवकर टक्कल पडण्यासाठी अनेक कारणं जबाबदार आहेत. यात चुकीच्या आहार पद्धती हार्मोन्सचा बॅलेन्स बिघडणं, तणाव आणि जास्त केमिकल्स चा वापर ही काही मुख्य कारणं आहेत. वेळेआधीच टक्कल पडण्याच्या समस्येने तुम्ही चिंतेत असला तर तुम्हाला या समस्येतून काहिसा दिलासा मिळू शकतो. 

काही घरगुतीउपायंच्या मदतीने या समस्येवर काही प्रमाणात फरक पडू शकतो. या घरगुती उपायांमुळे तुमची केस गळती तर थांबेलच शिवाय नवे केस उगवण्यासही मदत होईल. पाहुयात काही घरगुती उपाय.

हे देखिल वाचा-

पांढऱ्या केसांसाठी उपाय
Hair Care : Freezy केसांसाठी Easy टीप्स

नारळाचं तेल- केस गळतीवर नारवाचं तेल हे सगळ्यात गुणकारी ठरतं. यासाठी एका वाटीत नारळाचं तेल घेऊन ते कोमटं करावं आणि या तेलाने केसांना आणि केसांच्या मुळांना चांगलं मालिश करावं. किमान २ तास तरी तेल केसांमध्ये राहू द्याव. आठवड्यातून २ वेळा नारळाच्या तेलाने मालिश केल्यास केस गळती कमी होईल.

एलोव्हेरा- एलोव्हेरा म्हणजेच कोरफड ही तुमची त्वचा आणि केस दोन्हीसाठी उपयुक्त आहे. यासाठी कोरफडीचा गर केसांना आणि केसांच्या मुळांना लावून मालिश करावं. जवळपास अर्धा तासासाठी हा गर केसांना लावून ठेवावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसगळती कमी होईल तसचं केस सॉफ्ट देखील होतील. 

एरंडेल तेल- एरंडेल तेलामुळे केस गळती कमी होते. तसचं नवे केस उगवण्यासही एरंडेल तेल उपयुक्त ठरतं. रात्री झोपण्यापूर्वी यासाठी एरंडेल तेल घेऊन हलक्या हाताने केसांना मालिश करावं. हे तेल चिकट असल्याने जास्त मालिश करू नये अथवा तेल निघण्यास अडचणी येतील. तेल जास्तच चिकट असल्यास तुम्ही यात बदाम तेल किंना नारळाचं तेल मिक्स करून मसाज करू शकता.

त्यानंतर केस हलके बांधून झोपावं. यामुळे तेल मुरण्यास मदत होईल. सकाळी स्वच्छ पाण्याने केस धुवावे. आठवड्यातून किमान २ वेळा एरंडेल तेल लावल्यास तुम्हाला लगेचच फरक जाणवेल. एरंडेल तेलामध्ये असलेल्या रिसिनोलिईक ऍसिड आणि ओमेगा-६ इसेंशल फॅटी ऍसिड यामुळे टक्कल पडण्याची समस्या दूर होवू शकते.

कांद्याचा रस- कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात फ्लेव्होनॉइड्स आणि अँडीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. त्यामुळेच स्कॅल्पवरील बॅक्टेरिया दूर करणं आणि कोंडा कमी होण्यास मदत होते. परिणामी केस कमी गळतात. यासाठी तुम्ही आंघोळीपूर्वी केसांच्या मुळांना कांद्याच्या रसाने मसाज करा. 

नियमित पणे कांद्यांचा रस केसांना लावल्यास केस गळती पूर्णपणे थांबू शकते. यामुळे केस दाट होवून टक्कल पडण्याची शक्यता कमी होते. 

मेथी- मेथी हे केसांच्या सर्व समस्यांसाठी रामबाण समजले जाते. यासाठीच मेथीचं तेल केसांसाठी वापरल्यास अनेक समस्या दूर होवू शकतात. मेथीच्या  बियांमध्ये विटामिन ए, के आणि सीची मात्रा अधिक असते. तसचं फॉलिक असिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयरन असतं. मेथीमध्ये उपलब्ध असलेल्या निकोटिनिक एसिडचे घटक आणि प्रोटीनमुळे केस गळती कमी होते. 

मेथीच्या तेलासोबतच तुम्ही भिजवलेल्या मेथीची पेस्ट केसांना लावू शकता. ही पेस्ट अर्धा तास केसांना लावून ठेवा त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. 

या उपायांसोबतच केस गळती थांबवण्यासाठी आहारात पुरेश्या पोषक तत्वांचा समावेश करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. केसांना आतून आणि बाहेरून योग्य पोषण मिळाल्यास कमी वयात होणारी केस गळती थांबवून टक्कर पडण्याची चिता दूर करणं शक्य आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com