Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!

कोणावर अवलंबून न राहता स्वत:च घ्या स्वत:ची काळजी
Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!
esakal

आयुष्यभर नोकरी आणि पैसा यामागे धावपळ केल्यानंतर एक वेळ अशी येते की तूम्हाला थांबावेच लागते. तूमचं शरीर तूम्हाला थांबायला भाग पाडतं. त्याला आयुष्याची उतरंडी असेही म्हणतात. या काळात सर्वात जास्त गरज नातवंडांची आणि आपल्या जवळच्या माणसांची असते. पण, प्रत्येकाच्याच वाट्याला ते सुखं येत असं नाही.  

अनेक घरं खूप मोठी असतात पण त्यात राहणारी माणसं केवळ दोनच. तीही वृद्ध कोणाचाही आधार नसलेली. कारण, मुलगा परदेशात आणि मुलगी सासरी. राहिलं कोण नवरा बायको दोघेच. बरं त्या दोघांपैकी एकाची जरी साथ सुटली तरी भल्यामोठ्या घरात एकटा जीव राहणे केवळ अशक्यच.

तूमचंही वय झालंय, पहिल्यासारखी कामं होत नाहीत. तर आजपासूनच काही बदल तूमच्या जीवनशैलीत करून घ्या. जेणेकरून तूम्हाला एकट्याने कोणाचीही मदत न घेता वृद्धापकाळ व्यतीत करणे सोपे जाईल.  

मानसिक आरोग्य जपा

वय वाढल्याचा परिणाम जसा शरीरावर होतो तसा तो मनावरही होतो. गोष्टी विसरणे, चिडचिड होणे या गोष्टी सुरू होतात. त्यामूळे मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. आनंदी रहा, स्वत:ला एकटे समजून विचारात मग्न होऊ नका.

Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!
World Senior Citizens Day Special : कोरोना काळातही ज्येष्ठांचा एकमेकांना आधार

मॉर्निंग वॉक

आयुष्यभर तूम्ही कधीही व्यायाम केला नसेल.तर आता व्यायामासाठी बाहेर पडण्याची वेळ आली आहे असे समजा. कारण, उतरत्या वयात शरीर तंदुरूस्त रहावे यासाठी शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. गुढघेदुखी, पाय दुखी यामूळे चालणे टाळले जाते. पण असे करू नका. नियमित व्यायाम करा.

मॉर्निंग वॉक
मॉर्निंग वॉकesakal

डॉक्टरांची अपॉईंटमेन्ट

वय उतरतीला लागलं की नियमीत डॉक्टरांची अपॉईंटमेन्ट घ्या. रूटीन चेकअप करा. डॉक्टर, सिस्टर यांच्याशी सतत कॉन्टॅक्टमध्ये रहा. अगदीच इमरजन्सी असेल तेव्हा ओळखीच्या लोकांचे नंबर फेव्हरेट लिस्टमध्ये ठेवा.

डॉक्टरांची अपॉईंटमेन्ट
डॉक्टरांची अपॉईंटमेन्ट esakal

मित्र बनवा

उतरत्या वयात सोबत कोणी नसेल तर उरलेलं आयुष्य जगणं कठीण होईल. त्यामूळेच मित्र बनवा. मित्रांसोबत चहा, नाश्ता केलात तर दोन घास जास्त जातील. त्यांच्यासोबतच्या गप्पा तूमचं आयुष्य सुखकर बनवतील.

Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!
World Senior Citizens Day Special : कोरोना काळातही ज्येष्ठांचा एकमेकांना आधार
मित्र बनवा
मित्र बनवा esakal

केअर टेकर

आपलं काळजी घेणारं कोणीतरी हवं, ज्याच्याशी आपण मैत्रीपूर्ण वातावरणात आयुष्य व्यतीत करू. असे वाटत असेल तर तूमची काळजी घेण्यासाठी शक्य असल्यास केअर टेकर ठेवा. जेणेकरून ते तूमची चांगली काळजी घेतील. तूम्हाला जेवण आणि औषधे वेळेवर देतील.

Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!
Senior Citizen Day: म्हातारपणात आजारमुक्त राहाण्यासाठी लावा खाण्याच्या या पाच सवयी

ऑनलाईन रहा

बाहेर पडायला शरीर साथ देत नसेल तर काही ऑनलाईल क्लास जॉईन करा. फेसबुक, ट्विटरवर ब्लॉग लिहा. तूमचे अनुभन इतरांना शेअर करा. ज्यामूळे तूमचा बराच कंटाळा निघून जाईल.

Lifestyle Tips : वय उतरंडीला लागलंय?; अशी घ्या स्वत:ची काळजी!
Amrit Senior Citizen Scheme : रोज 9 हजार सुपर सिनिअर घेताय ‘मोफत प्रवासा’ चा लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com