Homemade Herbal Shampoo:तुम्हाला तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर घरच्या घरी तयार शॅम्पू... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Homemade Herbal Shampoo

Homemade Herbal Shampoo:तुम्हाला तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर घरच्या घरी तयार शॅम्पू...

Shampoo: बाजारात उपलब्ध असलेले शॅम्पू हे अनेक रासायनिक घटकांनी बनलेले असतात, त्याचा केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी हर्बल शॅम्पू तयार करू शकता, कसे ते पाहुया.केस गळणे, तुटणे तसेच रुक्ष होणं ही केसांची सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत केसांचे आरोग्य आणि सौंदर्य चांगले राखण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे केसांची काळजी घेत असतात. यासाठी अनेकजण बाजारातील केस सौंदर्य उत्पादनांची मदत घेत राहतात. या उत्पादनांमध्ये शाम्पूचाही समावेश आहे. केसांना मजबूत, रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही वापरत असलेले शॅम्पू हे मुख्यतः केवळ रासायनिक घटकांनी बनलेले असतात. जे तुमच्या केसांना झटपट सौंदर्य देऊ शकतात. परंतु, आपण त्यातून क्वचितच कायमस्वरूपी चांगले केस आणि त्यांचे सौंदर्य मिळवू शकतो.

हेही वाचा: Health Tips: वजन नियंत्रित करणारा आवळा चहा कसा तयार करायचा?

घरच्या घरी शॅम्पू कसा तयार करायचा?

एका मोठ्या पातेल्यात सुकवलेले रिठे, आवळा आणि शिककाई सम प्रमाणात म्हणजेच एक वाटी घ्यावे. त्यामध्ये ब्राम्ही, भृगंराज, मेथीचे दाणे, कलौजीं हे सर्व मिक्स करावे. या मिश्रणामध्ये 1/30 ते 2 लिटर पाणी घालावे. पाणी घातलेले हे मिश्रण थोड्या वेळाने मऊ पडेल. मऊ पडल्यानंतर हे मिश्रणातील  रिठा आणि शिकेकाईच्या बिया काठून टाकाव्यात. त्यामध्ये कडुलिंब, जास्वंदी आणि कढीपत्त्याची पानं घालून हे मिश्रण 10 मिनीटे उकळवून घ्यावे. उकळवून झाल्यानंतर ते थंड होईपर्यंत झाकून ठेवावे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर  सुती कापडामधून गाळून घ्यावे. अशा रितीने तुमचा हर्बल शॅम्पू तयार आहे. 

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटवा भाजी कशी तयार करायची?

कसा लावायचा हा शॅम्पू ?

हा शॅम्पू पातळ असतो. घट्ट करण्यासाठी गाळून  उरलेले मिश्रणातील पदार्थ मिक्सरमध्ये बिरक करून शॅम्पूमध्ये मिक्स करा. एक महिना हा शॅम्पू तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. आंघोळीच्या आधी अर्धा तास ते एक तास या शॅम्पूने केसांची हलक्या हाताने मालिश करावी. हर्बल शॅम्पू केसांच्या मुळांना लावावा. शॅम्पू धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. हर्बल शॅम्पूचा फक्त 3ते 4 वेळा वापर केल्याने केस गळती थांबते. तसेच कोंडा देखील जातो. केस दाट, काळेभोर आणि चमकदार होतात.