esakal | तुमच्याही बोटांची सालं निघतात? मग करुन पाहा घरगुती उपाय

बोलून बातमी शोधा

तुमच्याही बोटांची सालं निघतात? मग करुन पाहा घरगुती उपाय

तुमच्याही बोटांची सालं निघतात? मग करुन पाहा घरगुती उपाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक जण सुंदर दिसण्यासाठी आपल्या त्वचेची खासकरुन चेहऱ्याची काळजी घेत असतो. यामध्येच अनेकदा महिला ब्युटीपार्लर, महागडे सौंदर्य प्रसाधने यांचा वापर करुन सौंदर्य जपत असतात. परंतु, चेहऱ्यासोबतच आपल्या हात व पाय यांचंही सौंदर्य जपलं पाहिजे. हातांची योग्य काळजी घेतली नाही तर अनेकदा नखांजवळील त्वचेची सालं निघतात. त्यामुळे बऱ्याचदा वेदनादेखील होते. म्हणूनच, हा त्रास टाळण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

१. कोरफडीचा रस -

ऋतू बदलला की अनेकदा त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचेवरील सालं हळूहळू निघू लागतात. म्हणूनच अशा त्वचेवर कोरफडीचा रस लावावा. कोरफडीमुळे त्वचा मऊ व ओली राहते. त्यामुळे नखांजवळील साल निघत असेल तर, कोरफड जेल घेऊन ती काही वेळ फ्रीजमध्ये ठेवावी. त्यानंतर ती नखांभोवती लावाली. थोड्या वेळाने हात धुवून टाकावेत.

हेही वाचा: आहारात करा ५ पदार्थांचा समावेश; होणार नाहीत लशीचे साईड इफेक्ट्स

२. केळ्याचा गर -

अॅटिऑक्सिडंट म्हणून केळ्यांचा वापर केला जातो. त्यासोबत केळ्यांमुळे त्वचा मॉइश्चराइज होते. म्हणून त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी केळ्याचा लेप करुन तो हातांना लावावा. यासाठी एक चमचा केळ्याची पेस्ट घेऊन त्यात थोडं दूध घालावं त्यानंतर हे मिश्रण नखांभोवती लावावं. १० मिनिटांनी हात धुवून घ्यावेत.

३. व्हिटामिन ई ऑइल -

अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये व्हिटामिन ई ऑइलचा समावेश केला जातो. त्यामुळे त्वचेवरील सालं निघत असतील तर व्हिटामिन ई ऑइल घेऊन ते खोबरेल तेलात मिक्स करावं. त्यानंतर या तेलाने हातांना मालिश करावी.

४. मध -

मधामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तसंच अॅटिसेप्टिक म्हणूनही मधाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी नखाजवळील सालं निघत असल्यास त्या ठिकाणी मध लावावं. हा प्रयोग आठवड्यातून ३ वेळा करावा.