Walnut Scrubs : ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? मग, अक्रोडपासून बनवा 'हे' घरगुती स्क्रब, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक

Walnut Scrubs : चेहरा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी केवळ सकस आहार घेणे हे आवश्यक नाही, तर तुम्ही वाढत्या वयासोबतच त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.
Walnut Scrubs
Walnut Scrubsesakal

Walnut Scrubs : आपला चेहरा तजेलदार आणि फ्रेश दिसावा, असे प्रत्येक महिलेला वाटते. चेहरा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी केवळ सकस आहार घेणे हे आवश्यक नाही तर तुम्ही वाढत्या वयासोबतच त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आहारासोबतच तुम्ही स्किनकेअर रूटीन फॉलो करणे, महत्वाचे आहे.

जर तुम्ही स्किनकेअर रूटीनचे चांगल्या प्रकारे पालन केले तर, त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. यासोबतच चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे चमक देखील येईल. चेहऱ्यावरील समस्या टाळण्यासाठी तुम्ही त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे देखील तितकेच गरजेचे आहे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ करणे महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही स्क्रबची मदत घेऊ शकता.

मार्केटमध्ये अनेक प्रकारचे स्क्रब्स तुम्हाला मिळतील. मात्र, नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या स्क्रब्सचा वापर केल्याने चेहऱ्यावर साईडइफेक्ट्स होण्याचा धोका कमी असतो. शिवाय, त्वचेला अनेक फायदे देखील होतात. आज आम्ही तुम्हाला अक्रोडपासून बनवल्या जाणाऱ्या काही घरगुती स्क्रब्सबद्दल सांगणार आहोत.

Walnut Scrubs
Scrubs For Dry Skin : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात?ओट्स आहेत मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

अक्रोड आणि पपईचे स्क्रब

अक्रोड आणि पपईचे स्क्रब बनवण्यासाठी सर्वात आधी ५-७ अक्रोड पाण्यात भिजवा. त्यानंतर, हे अक्रोड पपईसोबत मिक्सरमध्ये बारीक करा. आता हे मिश्रण चांगले एकत्र करा. तुमचे अक्रोड आणि पपईचे स्क्रब तयार आहे

या स्क्रबमध्ये तुम्ही चिमूटभर हळद देखील मिक्स करू शकता. आता या स्क्रबच्या मदतीने हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर, १०-१५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

या फेस स्क्रबमुळे चेहऱ्यावरील डाग, ब्लॅहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल. या फेसस्क्रबमुळे चेहऱ्यावर सुंदर चमक देखील येईल. (Walnut and papaya scrub)

अक्रोड आणि मधाचे स्क्रब

मध आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अक्रोड आणि मधाचे स्क्रब बनवण्यासाठी रात्रभर ५-६ अक्रोड दुधात भिजवून ठेवा.

त्यानंतर, सकाळी त्याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये १ चमचा मध मिसळा. त्यानंतर, हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटे मसाज केल्यानंतर, थोड्यावेळाने चेहरा धुवा.

मग, बघा तुमच्या चेहऱ्यावर सुंदर चमक येईल. डोळ्यांखालील काळी वर्तुळे, काळसर डाग आणि चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या दूर करण्यासाठी हे स्क्रब फायदेशीर आहे. (Walnut and Honey scrub)

Walnut Scrubs
Scrubs For Oily Skin : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग तांदूळ आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com