Hotel Secrets | हॉटेलमधील स्वच्छतागृहे इतकी चकाचक का असतात ? रहस्य माहितीये का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel Secrets

Hotel Secrets : हॉटेलमधील स्वच्छतागृहे इतकी चकाचक का असतात ? रहस्य माहितीये का ?

मुंबई : हॉटेलचे टॉयलेट नेहमी स्वच्छ असते. तुम्ही जेव्हा हॉटेलच्या टॉयलेटमध्ये जाता तेव्हा तुम्ही तिथे टापटीपपणा आणि स्वच्छता पाहिली असेल. आपल्या घरातील स्वच्छतागृह इतके स्वच्छ का राहात नाही, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल.

कर्मचारी काळजी घेतात

हॉटेलच्या बाथरूमची काळजी घेण्यासाठी योग्य कर्मचारी नेमलेले असतात. हे कर्मचारी दररोज बाथरूम साफ करतात. तसेच, कोणालाही खोली देण्याआधीही कर्मचारी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतात. हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

हेही वाचा: Happy Life : कामाचं टेन्शन, आर्थिक ताण... अशा स्थितीत स्वत:ला आनंदी कसं ठेवाल ?

छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते

कोणत्याही प्रकारची चप्पल घालून आपण घराच्या बाथरूममध्ये जातो. कोणतीही वस्तू कुठेही ठेवतो. पण प्रत्यक्षात हॉटेलचे बाथरूम-टॉयलेट यापेक्षा वेगळे असते. हॉटेलच्या बाथरुममधील प्रत्येक वस्तूची एक नियुक्त जागा असते जिथे ती ठेवली जाते.

साफसफाईसाठी भरपूर डिटर्जंट वापरले जातात

हॉटेलचे कर्मचारी बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे क्लिनिक डिटर्जंट वापरतात. तसेच, बाथरूममध्ये उपस्थित असलेल्या सर्व गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या क्लिनिक डिटर्जंटचा वापर केला जातो.

कमी वापर

हॉटेलचे बाथरूम घरातील बाथरूमपेक्षा कमी वापरले जाते, त्यामुळे ते स्वच्छ राहते.

हेही वाचा: Toilet Cleaning : टॉयलेटमधील दुर्गंधी कशी पळवाल ?

घरातले स्वच्छतागृह कसे स्वच्छ ठेवाल ?

  • रोज सकाळी घरातील सदस्यांनी स्वच्छतागृह वापरून झाल्यावर कमोड स्वच्छ करा.

  • आठवड्यातून एकदा टाइल्सची स्वच्छता करा.

  • वास येऊ नये म्हणून एअर फ्रेशनर, ओडोनील वापरा.

  • स्वच्छतागृह वापरून झाल्यावर व्यवस्थित फ्लश करण्याची सवय घरातील प्रत्येक सदस्याला असावी.

  • आंघोळ करून झाल्यानंतर काथा, साबण नीट धुऊन ठेवा.

  • सर्व वस्तू जागच्या जागी ठेवा.

टॅग्स :Drainage Cleaningtoilets