अन् तो वेडिंग केक कायमचा लक्षात राहील!

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
wedding cake
wedding cakeesakal

आजकाल लग्नात (marraige) दोघांनी केक (cke)कापणे ही अत्यंत मह्त्वाची गोष्ट समजली जाते. लग्नासाठी आता एकसोएक केकही मिळतात. पण विचार करा, भला मोठा केक तुम्ही दोघांनी कापण्याआधीच पडला तर! असे एका लग्नात झाले असून याबाबतचा व्हिडियो व्हायरल (viral video)झाला आहे.

नवरा बायको केक कापण्यासाठी उभे असताना भलामोठा वेडिंग केक घेऊन येत असताना हॉटेल कर्मचाऱ्याच्या हातातून चुकून निसटला. अन ते पाहून नवरा-बायकोचा चेहरा पाहण्यासारखा झाला, हा व्हिडिओ पाहून इतका मोठा केक पडल्याने सारेच हळहळतात. पण त्यानंतर या जोडप्याला खरे सरप्राईज मिळते. घरच्यांनी मुद्दाम हा प्रेंक केलेला असतो. जो केक पडला तो केक नसून केकसारखे सजवेलेले बॉक्स होते. त्यानंतर लगेचच दोघांसाठी खरा केक आणण्यात आला.

wedding cake
Pre Wedding Photoshoot : मुंबई, पुण्याजवळचे 'बेस्ट' स्पॉट्स

इन्स्टाग्राम पेज she saidyes वर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ही एक इंस्टाग्राम रील होती ज्यामध्ये जोडप्यांनी नंतर हा सुंदर केक कापला आणि कुटुंबासह त्याचा आनंद घेतला. हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला असून त्याला २.५ मिलियन व्हूज मिळाले आहेत. अनेकांनी विविध कमेंटस केल्या आहेत.

wedding cake
Viral Wedding Card वकिलाच्या लग्नपत्रिकेत मॅरेज अ‍ॅक्ट अन् संविधानाची कलमं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com