India's Sleepless Capital: हवामान बदलामुळे 'या' शहराने गमावली वर्षाला ९३ तासांची झोप!

Climate Change Stole Their Sleep: हवामान बदलामुळे रात्रीचा उकाडा वाढला; वर्षाला सरासरी ५६ तास झोप होतेय कमी! क्लायमेट सेंट्रलचा धक्कादायक अहवाल.
Chennai Loses 93 Hours of Sleep!

Chennai Loses 93 Hours of Sleep!

esakal 

Updated on

Is Climate Change Waking You Up?: तुम्हालाही रात्री अचानक जाग येते का? किंवा दिवसभर थकूनही रात्री लवकर झोप लागत नाहीये का? सामान्यतः आपण याचे कारण ताणतणाव, स्क्रीन टाईम किंवा चहा-कॉफीला मानतो. पण, एका नवीन अहवालानुसार कोट्यवधी भारतीयांची झोप उडवण्यामागे एक वेगळंच आणि गंभीर कारण समोर आलं आहे, ते म्हणजे 'हवामान बदल' (Climate Change).

'क्लायमेट सेंट्रल'च्या ताज्या अहवालानुसार, जागतिक तापमानवाढीमुळे रात्रीच्या तापमानात होणारी वाढ ही आता एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. या अहवालात भारतातील १०७ शहरांसह जगभरातील १,३३८ प्रमुख शहरांच्या तापमान डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. या विश्लेषणातून समोर आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com