Home Decor Ideas: उन्हाळ्यात द्या घराला नवा लूक, 'अशी' करा सजावट

Home Decor Ideas: घराला नवा लूक द्यायचा असेल तर पुढील पद्धतीने सजावट करू शकता.
Home Decor Ideas
Home Decor IdeasSakal

how decorate home in summer in low budget read tips

घर हे एक असे ठिकाण आहे जिथे आल्यावर दिवभराचा थकवा कमी होतो. अनेक लोक ऋतुनुसार घराची सजावट करतात. पण काही लोकांना असे वाटते की घराची सजावट करायची असेल तर लाखो रूपये खर्च करावे लागतात. पण असे काही नाही तुम्ही पुढील पद्धतीनुसार कमी खर्चात घराची सजावट करू शकता. यामुळे तुमच्या घराला उन्हाळ्यात नवा लूक मिळेल.

  • फुलांची सजावट

घराच्या हॉलमध्ये सुंदर फुलांची सजावट करू शकता. यामुळे घरात फुलांचा सुगंध पसरले. घरातील वातावरण प्रसन्न राहील. चाफा, मोगरा यासारख्या फुलांचा वापर करून तुम्ही घराची सजावट करू शकता.

  • घरात झाडे ठेवावी

घराचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी घरात इनडोअर प्लांट्स ठेऊ शकता. जर तुम्ही झाडे लावलीत तर ते तुमच्या घराला नैसर्गिक सजावट मिळेल. तुम्हालाही तुमचे घर सजवायचे असेल तर झाडे ठेऊ शकता. मनीप्लांट, बांबु यासारखे झाडं घरात ठेऊ शकता.

  • वॉल हँगिंग

घराची सजावट करतांना तुम्ही वॉल हँगिंगची मदत घेऊ शकता. यामुळे घरातील भिंतींचे सौंदर्य वाढेल. तुम्ही हँडमेड वॉल हँगिंग लावू शकता. तसेच बाजारत देखील बजेटमध्ये असलेले विविध वॉल हँगिंग उपलब्ध आहेत.

Home Decor Ideas
Vitamin B12 Deficiency: चाळीशीनंतर 'जीवनसत्व बी 12' ची कमतरता असल्यास दिसतात 'ही' लक्षणे
  • लाइट रंगाचे पदडे

घरातील पडदे बदल्यास घराचा संपुर्ण लूक बदलतो. तुम्ही घरचे पडदे ऑनलाइन देखील ऑर्डर करू शकता. बजेटमध्ये तुम्ही सहज पडदे खरेदी करू शकता. उन्हाळ्यात लाइट रंगाचे पडदे लावावे. तुम्ही पांढरा, लाइट गुलाबी यासारखे रंग वापरू शकता. यामुळे घरात मच्छर देखील येणार नाही. तसेच घरात शांत वाटेल.

  • घरात कमी सामान ठेवा

घर सजवण्यासाठी आपल्याला प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या घराला आकर्षक लुक देण्यासाठी खोलीत ठेवलेले कपडे किंवा अतिरिक्त वस्तू काढून टाका. खोली जितकी साधी आणि स्वच्छ ठेवाल तितकी ती अधिक सुंदर दिसेल.

  • लाइटिंग

तुम्ही घर सजवण्यासाठी लाइटिंगची मदत घेऊ शकता. यामुळे घराला आकर्षक लूक मिळेल. तुम्ही रंगीत किंवा मंद प्रकाश असलेल्या लाइटिंगचा वापर करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com