
नागपूर : वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी फक्त वेळ काढणे गरजेचे नसते, तर शांत डोक्यांनी व्यायाम करणेही तितकेच महत्वाचे आहे. आहार काय घ्यायचा? चांगल्या वर्कआऊटसाठी काय करायला पाहिजे? या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास वजन झटपट कमी होण्यास मदत होते. धावपळीच्या जीवनात काही जोडपे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना मनासारखा रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे अनेकजण निराशही होतात.
महिला घरचे आणि बाहेरचे काम करताना स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतात. तसेच पुरुषांवरही कामाचा जास्त ताण असतो. वर्कआऊट करतानाच मध्येच दुसरे कामे करावे लागतात. मात्र, या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराची मदत करू शकता. पण, जोडीदाराला वजन कमी करायचे असेल तर आपण कशी मदत करणार? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. मात्र, वजन कमी करताना तुमच्या जोडीदाराची कितपत सोबत असते यावरही अनेक परिणाम अवलंबून असतात.
प्रोत्साहीत करा -
तुमच्या जोडीदाराने वजन कमी करायचे ठरवले असेल आणि त्यासाठी तो किंवा ती मेहनत घेत असेल त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका. तुम्ही प्रोत्साहीत केल्यास ते प्रामाणिकपणे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतील. तसेच याचा रिझल्ट देखील चांगला आणि झटपट मिळेल. यावेळी त्यांना वाईट वाटेल असं काहीही बोलू नका. नाहीतर त्यांचे मनोबल खचून वजन कमी करण्याचे प्रयत्न ते थांबवू शकतात.
भावनिक सहाय्य -
तुमचा जोडीदार वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला भावनिक सहाय्य करण्यात कुठुलीही कसर सोडू नका. असे केले नाहीतर त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल. त्यांना तुम्ही भावनिक सहाय्य केल्यास त्यांना वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील. त्यामुळे त्यांचे प्रयत्न ते सुरू ठेवतील.
हेल्दी खाण्यामध्ये मदत करणे -
तुमच्या जोडीदाराने लवकर वजन कमी करावे, असे तुम्हाला वाटत असेल त्यांना हेल्दी खाऊ घाला. तसेच तुमच्या जोडीदाराचा डायट प्लॅन सुरू असेल तर त्यावेळी तुम्हीसुद्धा बाहेरचे खाणे टाळायला पाहिजे. ती जे काही हेल्दी फूड खाईल, ते तुम्हीही खाणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हीही फीट राहाल.
मूड स्विंग्समध्ये साथ द्या -
वजन कमी करणे हे खूप कठीण काम आहे. त्यादरम्यान तुमच्या जोडीदाराचे मूड स्विंग्स म्हणजे कधी राग येत असेल, चिडचिड होत असेल तर ते तुम्ही सहन करायला पाहिजे. त्यावेळी वजन कमी करणे कठीण आहे, पण अशक्य नाही अशा, असे त्यांना सांगायला पाहिजे. तसेच राग आणि ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मेहनतीवर परिणाम होऊ शकते, हे देखील त्यांना सांगायला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.