अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना भीती वाटते? जाणून घ्या, सोप्या टिप्स

अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना भीती वाटते? जाणून घ्या, सोप्या टिप्स

Relationship Tips : एखाद्या पार्टीमध्ये, कॉलेजमध्ये तुम्हाला कधी एखादी मुलगी आवडते. तुम्हाला तिच्यासोबत बोलायची इच्छा असते पण, हिंमत्तच होत नाही. मुलींशी काय बोलावे? कसे बोलावे समजत नाही? मग टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी मैत्री कशी करावी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना भीती वाटते? जाणून घ्या, सोप्या टिप्स
World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात

- कोणत्याही मुलींसोबत बोलण्यास सुरवात करण्याआधी पहिल्यांदा तिची आवड जाणून घेणे योग्य ठरले. मुलींना त्याच्याबाबतची सर्व गोष्टी मुलांनी लक्षात ठेवायला हवे असे वाटत असते. त्यामुळे कोणतरी त्यांचा विचार करत आहे याची जाणीव होते.

- जर तुम्ही कोणत्याही मुलीसोबत बोलण्याची सुरूवात करताना 'हॅलो' म्हणा. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन हॅलो म्हणा आणि स्वत:चे नाव सांगा आणि मुलींला तिचे नाव विचारा, तुम्हाला हे शक्य नसेल तर काही काम किंवा एखादा प्रश्न विचारून तुम्ही बोलायला सुरवात करू शकता.

अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना भीती वाटते? जाणून घ्या, सोप्या टिप्स
भाई का बड्डे! रेल्वे स्टेशनवर कापले ५५० केक; Video Viral

- तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करताना स्वत:ची ओळख गमवू नका. मुलींना खोटी वागणारी मुलं अजिबात आवडतं नाही आणि जी मुलं स्वत:ला आवडेल तसे राहतात अशीच मुलं मुलीना आवडतात. तुम्ही जर खूप शो-ऑफ केले तर मुली तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात.

- मुलींना प्रश्न विचारून त्यांच मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना मुलींना गप्पा मारायला आवडतात असे प्रश्न तुम्ही विचारू करते. बोलताना मुलीचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

अनोळखी मुलीसोबत मैत्री करताना भीती वाटते? जाणून घ्या, सोप्या टिप्स
World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात

- थोडा बोलायला सुरवात झाल्यावर मुलींचे कौतुक करा ज्यामुळे तुमचा गप्पा चालू राहतील. पण मुलींचे कौतुक करताना जे दिसतेय त्याबद्दलच बोला. खोटे कौतुक करू नका नाहीतर मुली चिडू शकतात आणि तुम्हाला खोटारडा समजू शकते.

- कोणत्याही मुलीसोबत मैत्री करण्यापूर्वी तिला तुमच्यामध्ये रुची आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुमच्या बोलताना तिला मज्जा येतेय का याचा अंदाज घ्या.

- जेव्हा मुलगी तुमच्यासोबत कन्फर्टेबल असेल तेव्हाच तुमची मैत्री होईल. त्यानंतर तुम्ही तिच्या कुटंबाबात जाणून घेऊ शकता आणि आपल्या कुटुंबाबत बोलू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com