esakal | भाई का बड्डे! रेल्वे स्टेशनवर कापले ५५० केक; Video Viral
sakal

बोलून बातमी शोधा

भाई का बड्डे! रेल्वे स्टेशनवर कापले ५५० केक; Video Viral

भाई का बड्डे! रेल्वे स्टेशनवर कापले ५५० केक; Video Viral

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. आपला वाढदिवस खास पध्दतीने साजरा व्हावा असे कोणाला नाही वाटतं. प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साही असतो. पण कित्येकदा हाच उत्साहीपणा आपल्या अंगलट येऊ शकतो. असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. मुंबईतील एका रेल्वेस्टेशनवर एकाने ५५० केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात

आतापर्यंत वाढदिवस साजरा करण्यासाठी तलवारी किंवा कोयत्याने केप कापल्याचे प्रकार या आधी घडले आहेत. पोलिसांनी अशा अतिउत्साही लोकांवर कारवाई केली आहे तरीही लोकांचा वाढदिवस साजरा करण्याचा अतिउत्साह जराही कमी होत नाही. मुंबईतही एका व्यक्तीने असाच अतरंगी पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस कोणत्या रेस्तरॉंमध्ये किंवा रस्त्यावर नव्हे तर चक्क कांदिवली रेल्वे स्टेशनवर साजरा केला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर तब्बल ५५० केक या अवलियाने कापले आहे. सुर्या रेतुडी असे या अवलियाचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागून केलेल्या नियामांचा विसर या व्यक्तीला पडलेला आहे.

हेही वाचा: वाहतूक कोंडीत अडकलाय? हॉर्न वाजवण्यास मुले मिळतील

कोरोना नियम पायदळी तुडवित रेल्वे स्टेशनवर ५५० केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ या व्यक्तीला अडचणीमध्ये टाकणार आहे. कोरोना नियामांचे सर्रास उल्लंघन केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये खूप लोंकांची गर्दी दिसत आहे, कोणीही मास्क लावले नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिस आणि मुंबई महानगर पालिकेच्या कारवाईची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे. अशातच एखादा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलिस या व्यक्तीवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

loading image
go to top