Kitchen Hacks: तवा सारखा खराब होतोय, असा करा स्वच्छ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तवा सारखा खराब होतोय? असा करा स्वच्छ
Kitchen Hacks: तवा सारखा खराब होतोय, असा करा स्वच्छ

तवा सारखा खराब होतोय? असा करा स्वच्छ

प्रत्येकाच्या घरात लोखंडी तवा असतो, या तव्यावर पोळ्या केल्या जातात. तर परोठे, डोसे, घावन असे प्रकारही करता येतात. पण कधी कधी तवा खूप गरम झाला की पोळी, पराठा जळण्याचा धोका असतो. त्यांनंतर तव्यावर कार्बनचा थर जमा होतो. हा थर स्वच्छ केला नाही तर तो पोटात जाऊन आरोग्याला अपाय होण्याची शक्यता असते. पण असा जळलेला तवा साफ करणे हे मोठे दिव्य असते. तवा नीट साफ झाला नाही तरी काहीजणी त्याच्यावर पोळी, परोठा करतात. पण असे न करता तो साफ करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हे तीन उपाय करून पाहा.

1) जर तवा फारसा गरम नसेल तर तो गरम करा. तवा गरम झाल्यावर साचलेल्या कार्बनचा थर काढून टाका. असे केल्याने फार प्रयत्न न करता तवा काही वेळात स्वच्छ करता येईल. कार्बन काढून टाकल्यावर भांड्यांच्या साबणाने तवा स्वच्छ केल्यावर तवा पूर्वीप्रमाणेच चमकू लागले.

2) जर तवा खूप जळला असेल तर नुसते साबणाने साफ करून उपयोग होणार नाही. अशावेळी गरम तव्यावर मीठ टाका. त्याचा रंग बदलला की चाकूने कार्बन खरडून घ्या. डाग पडला असेल तर एक चमचा लिंबाचा रस घालून तो डाग घालवा. लिंबाच्या सालीनेही तवा स्वच्छ होण्यास मदत होते.

3) तवा उलटा करून तो मोठ्या गॅसवर गरम करा. मग त्यात व्हिनेगर घालून चांगले पसरवा. लोखंडी स्क्रबरने घासल्यावर तवा बऱ्यापैकी स्वच्छ होऊन चमकू लागेल.