Kitchen Hacks: गॅस सिलिंडर लवकर संपतोय? 'या' चुकीमुळे होते गॅसची नासाडी; ट्राय करा बर्नर साफ करण्याची सोपी पद्धत!

How to Clean Gas Burner to Save LPG Cylinder & Money: काळा पडलेला अन् बंद पडलेले छिद्र असलेला बर्नर ठरतोय गॅस वाया जाण्याचे मुख्य कारण! घरात उपलब्ध असणाऱ्या ३ गोष्टींनी मिनिटांत चमकवा बर्नर आणि वाचवा गॅस...
Simple Gas Burner Cleaning Hack to Reduce Cylinder Consumption and Save Money

Simple Gas Burner Cleaning Hack to Reduce Cylinder Consumption and Save Money

esakal 

Updated on

Fix Yellow Gas Flame and Save LPG: घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींच्या काळात जर गॅस सिलिंडर वेळेआधीच खाली होत असेल, तर घराचे बजेट बिघडणे स्वाभाविक आहे. अनेकदा गॅस वाचवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात, पण शेगडीवरील सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे म्हणजेच गॅस बर्नरकडे दुर्लक्ष होते.

जर तुमच्या गॅसचा बर्नर काळा पडला असेल किंवा त्याचे छिद्र (holes) कचऱ्यामुळे बंद झाले असतील, तर गॅसच्या शेगडीतून निळ्या ऐवजी पिवळी किंवा नारंगी ज्योत निघू लागते. याचा थेट अर्थ असा की गॅसची मोठी नासाडी होत आहे आणि स्वयंपाकालाही जास्त वेळ लागत आहे. हा काळा झालेला बर्नर साफ करण्यासाठी महागड्या रसायनांची गरज नाही; घरातील घटकांपासूनच तो अगदी नव्यासारखा चमकवता येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com