esakal | Home Tips : 'या' ८ ट्रीक्स वापरा अन् स्वच्छ करा बाथरुमच्या टाइल्स
sakal

बोलून बातमी शोधा

bathroom-tiles

'या' ८ ट्रीक्स वापरा अन् स्वच्छ करा बाथरुमच्या टाइल्स

sakal_logo
By
शर्वरी जोशी

घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी ठेवायचं असेल तर घरात स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ राहिल याकडे प्रत्येकानेच लक्ष दिलं पाहिजे. अनेकदा आपण घर स्वच्छ करताना केवळ जमीन, छत, घरातील कानेकोपरे, स्वयंपाकघर हेच स्वच्छ करतो. मात्र, या सगळ्यासोबतच घरातील बाथरुम आणि टॉयलेट स्वच्छ करणंदेखील तितकंच गरजेचं आहे. कारण, अनेकदा बऱ्याच आजारांचा प्रसार हा बाथरुम आणि टॉयलेटमधून होत असतो. विशेष म्हणजे घरातील बाथरुमचा वापर हा सर्वाधिक वेळा केला जातो. त्यामुळे सहाजिकच बाथरुममधील टाइल्स खराब होतात.त्यावर काळे, पिवळे डाग पडतात किंवा त्या निसरड्या होतात. म्हणूनच,बाथरुममधील टाइल्स कशा स्वच्छ करायच्या ते पाहुयात. (how-to-clean-your-bathroom-tiles)

१. अनेकदा टाइल्सच्या मधल्या फटी (रेषा) काळ्या पडतात. त्यामुळे अशा वेळी मेणबत्ती पेटवून तिची ज्योत या रेषांवर (टाइल्समधील फटी) फिरवावी. त्यानंतर एका कापडाच्या सहाय्याने या रेषा जोरजोरात रगडून पुसून घ्याव्यात.

हेही वाचा: सी-सेक्‍शन डिलिव्हरीनंतर पाय सतत दुखतात? जाणून घ्या कारणे

२. टाइल्सवर पिवळे डाग पडले असतील तर बेकिंग सोड्याने टाइल्स स्वच्छ घासाव्यात. त्यानंतर गरम पाण्याने त्या पुसून घ्याव्यात.

३.बऱ्याचदा टाइल्सचे कोपरे काळे होतात. त्यामुळे गरम पाण्यात हायड्रोजन पॅराक्साइड मिक्स करुन त्याची घट्ट पेस्ट तयार करा. व, ही पेस्ट कोपऱ्यांवर लावा आणि ब्रशने घासा. अर्ध्या तासाने गरम पाण्याने बाथरुम स्वच्छ धुवून घ्या.

४. अर्धा लीटर गरम पाण्यात १५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिक्स करा आणि त्याने टाइल्स पुसून घ्या.

५. व्हिनेगर एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन ते संपूर्ण बाथरुममध्ये मारा आणि १० मिनिटांनंतर कापडाने टाइल्स पुसून घ्या.

loading image