esakal | सी-सेक्‍शन डिलिव्हरीनंतर पाय सतत दुखतात? जाणून घ्या कारणे
sakal

बोलून बातमी शोधा

legs pain

सी-सेक्‍शन डिलिव्हरीनंतर पाय सतत दुखतात? जाणून घ्या कारणे

sakal_logo
By
शर्वरी जोशी

बाळाला जन्म देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी. मात्र, बऱ्याचदा काही कॉम्प्लिकेशन्समुळे नॉर्मल डिलिव्हरी करता येत नाही. पर्यायी अनेकदा सी सेक्शनद्वारे बाळाला जन्म द्यावा लागतो. परंतु, सी सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिल्यानंतर अनेकदा स्त्रियांना विविध शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो. यात खासकरुन पोट सुटणे, कंबर, पाठ किंवा पाय दुखणे या सारख्या समस्या निर्माण होतात. विशेष म्हणजे यात खासकरुन पायदुखीची समस्या बराच काळ तशीच राहते. म्हणूनच, सी सेक्शन केल्यानंतर स्त्रियांचे पाय का दुखतात ते पाहुयात. (lifestyle-family-leg-pain-after-cesarean-delivery-ssj93)

१. नसांना (शिरांना) दुखापत होणे -

सी सेक्शन म्हणजेच सिजेरियन डिलिव्हरी करत असताना स्त्रियांना एपिड्युरल पोजिशनमध्ये रहावं लागतं. मात्र, या पोजिशनमुळे अनेकदा स्त्रियांच्या शरीरातील नसांवर ताण येतो. परिणामी, शिरांना (नसांना) दुखापत होते. त्याचसोबत नॉर्मल डिलिव्हरी करतानादेखील लिथोटोमी पोजिशनचा वापर केला जातो. यातदेखील स्त्रियांच्या शरीरावर ताण येतो. परिणामी, डिलिव्हरीनंतर बराच काळ स्त्रियांना शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं.

हेही वाचा: हाडांना बनवा स्ट्राँग! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

२. स्नायूंवर ताण येणे -

अनेकदा काही कॉम्प्लिकेशनमुळे इमरजन्सीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, दरवेळी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी नॉर्मल पद्धतीने प्रसूती होण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळी अनेकदा वेगवेगळ्या पोजिशनमध्ये डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्नायूंवर ताण येण्याची शक्यता असते.

३. कंपार्टमेंट सिंड्रोम-

अनेकदा सी सेक्शन डिलिव्हरीनंतर स्त्रियांमध्ये कंपार्टमेंट सिंड्रोमची समस्या निर्माण होते. ज्यामुळे स्त्रियांचे पाय प्रचंड दुखतात. यावेळी पायांवर सूज येणे, पायात गोळे येणे या सारख्या समस्या निर्माण होतात. कंपार्टमेंट सिंड्रोममध्ये पायांमधील स्नायूंना होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे पायाच्या समस्या निर्माण होतात. प्रसुती होत असताना अतिरक्तस्राव किंवा कमी रक्तदाब यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या काळात देण्यात येणाऱ्या औषधांचा परिणाम झाल्यानंतरही कंपार्टमेंट सिंड्रोमचा त्रास निर्माण होतो.

loading image