Parenting Tips: भावंडांचं एकमेकांसोबत पटत नाहीये? 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावंडांचं एकमेकांसोबत पटत नाहीये? 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा!
Parenting Tips: भावंडांचं एकमेकांसोबत पटत नाहीये? 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा!

भावंडांचं एकमेकांसोबत पटत नाहीये? 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा!

पालकत्वाच्या बाबतीत कुटुंबातील सर्वांना एकमेकांविषयी प्रेम, काळजी वाटते. नात्याचा पाया खूप घट्ट असतो. भावंडांचे संबंध हे सगळ्यात महत्वाचे आहेत. कारण त्यांचे बंध दिर्घकाळ टिकणारे असतात. यात मुलांचे आई-बाबा मोठी भूमिका बजावत असतात. तुम्ही त्यांना एकमेकांचा आदर करण्यास, पटवून घेण्यास नक्कीच सांगू शकता. परंतु त्यांचे तरीही पटत नसल्यास पालकांनीही थोडे मुलांना एकमेकांबरोबर पटण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही? अशी वाढवा एकाग्रता

मुलांची तुलना करू नका

जेव्हा कोणीतरी आपल्याला काही गोष्टी वारंवार सांगतो, तेव्हा माणूस म्हणून आपण त्यावर लवकर किंवा अनुभवामुळे विश्वास ठेवतो. लहान मुलांच्या बाबतीत सांगायचे तर, ती त्यांना केलेली टिका आणि कौतुकाविषयी संवेदनशील असतात. ते नकारात्मक गोष्टींचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. ते त्यांच्या वागणूकीतून सहजपणे दिसते. अशावेळी ते खायला टाळाटाळ करतात. खेळणे, बोलणे बंद करतात. तु तुझ्या भाऊ किंवा बहिणीसारखा समजूतदारपणे का वागत नाहीस, अशी तुलना अशावेळी करू नका.

त्यांना एकत्र काम करायला द्या

मुलांच्यात सहकार्य वाढविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना एकत्र काम करायला देणे. त्यांना एकत्र चित्र काढायला सांगा. किंवा लेगो हाऊससारखे खेळ खेळायला द्या. या एक्टीव्हीटीजमुळे मुलांमध्ये कोणताही संघर्ष रचनात्मक मार्गाने सोडवण्याची भावना विकसित होईल. याव्यतिरिक्त तुमच्या घरातील कामे जसे कपडे वाळत लावणे, भांडी पुसून जाग्यावर लावणे, जेवणाआधी ताटं वाट्या घेणे अशी कामं त्यांना सांगू शकता. हे काम कोण लवकर करते हे पाहण्यासाठी तुम्ही त्यांच्यात गमतीशीर शर्यत लावू शकता.

सहानुभूती शिकवा

जसे तुमचे मूल मोठे होत जाते तसे मुलांना समोर बसवून त्यांच्यात आपल्या भावंडांविषयी दयाळूपणा, करूणा कशी वाढीस लागेल, याविषयी मोकळेपणाने चर्चा करा. त्यात समतोल राखणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ- जर तुमचं एक मूल खूप सोशल असेल आणि दुसरं अजिबात सोशल नसेल, शांत असेल तर तो किंवा ती काही गोष्टींमध्ये भाग घेण्यासाठी मदत करू शकतात.

त्यांना त्यांचा वेळ द्या

मोठ्यांप्रमाणे मुलांनाही त्यांचा स्वत:चा वेळ आणि स्पेस हवी असते. कधीकधी खूप वेळ एकत्र घालविल्यानेही मुलांना कंटाळा येऊ शकतो. जेव्हा ते त्यांच्या भावंडांशिवाय वेळ घालवतात, तेव्हा ते त्याचे अधिक कौतुक करतात. ते त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ घालवतात. इतरांशी मोजमाप न करता ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा आनंद शोधतात.

कुटूंब म्हणून वेळ घालवा

कुटूंब म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवणे, घट्ट संबंध निर्माण करणे गरजेचे असते. अशावेळी तुम्ही छोट्या ट्रीपला जाउ शकता. हाईकिंग ला जाऊ शकता. किंवा घरीच केक बेक करू शकता. अशा अनेक गोष्टी करताना कुटूंब म्हणून तुम्ही एकत्र आल्याने तुम्हा चौघातला बॉण्ड विकसित होऊ शकतो.

loading image
go to top