Exam Fever मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही? अशी वाढवा एकाग्रता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Study
Exam Fever मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाहिये? अशी वाढवा एकाग्रता

मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही? अशी वाढवा एकाग्रता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुलांचे लक्ष अभ्यासात लागलं म्हणजे मिळवलं, कारणं अभ्यासाला बस म्हटलं की काहींना सारखी बाथरूमला लागते तर काहींना लगेच भूक लागते. मुलांच्या या पद्धतीमुळे पालक वैतागलेले असतात. काही मुलं अभ्यासाला बसायचं नाटक करतात. पण लक्ष भलतीकडे असतं. त्यामुळे मुलांना परत अभ्यासात मन एकाग्र करायला लावणे कठीण काम असते. जी मुलं खूप मस्तीखोर असतात त्यांच्यासाठी ही बाब आणखी कठीण असते. अशावेळी काही टिप्स वापरून तुम्ही मुलांचा अभ्यास आवडीचा करू शकता.

हेही वाचा: हिवाळ्यात चिमुकल्यांची अशी घ्या काळजी

Study

Study

वातावरण तयार करा

मुलांचं काहीच एेकून न घेता आई- बाबा मुलांना अभ्यासाला बसवितात. अशावेळी त्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे मुलांना वर्गात पाठविण्याआधी असे काही करावे लागते की ज्यामुळे मुले अभ्यास करायला कंटाळणार नाहीत.यासाठी तुम्ही आकर्षक स्टेशनरीची मदत घेऊ शकतात. तुम्ही मुलांना सुंदर स्टेशनरीने भरलेली हॉबी बॅग देऊ शकता.

टू- डू लिस्ट

आजचा दिवस कसा घालवायचा, याबाबत मुलं खूप उत्साही असतात. यासाठी तुम्ही सुरूवातीपासूनच मुलांना टु- डू लिस्ट तयार करण्याची सवय लावा. असे केल्याने त्या त्या वेळात ती त्यांचे काम पूर्ण करतील. असे केल्याने त्यांचा उत्साह वाढेल. तसेच एकाग्रता वाढीस लागेल.

हेही वाचा: मुलं क्यॅव क्यॅव करताहेत! त्यांना कसं गप्प कराल, फॉलो करा 'या' टीप्स

Study

Study

फ्लोचार्ट आणि लाईफ लर्निंग

तुम्ही तुमच्या घरात टेक्सचर प्रिंटेड बुलेटिन बोर्ड लावू शकता. तो पाहून त्याकडे तुमच्या मुलाचे लक्ष वेधले जाईल. त्यावर तुम्ही तुमच्या मुलांना करायला सांगितलेल्या गोष्टी पीन करू शकतो. यावर तुम्ही मुलांच्या अभ्यासासंबधी काही इंटरेस्टींग फोटो लावू शकता. त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी वाढू शकेल.

पांढरा बोर्ड आणि खडू बोर्ड

बाजारात सध्या नवीन प्रकारच्या बोर्ड मिळत आहे. जो एका बाजूने पांढरा तर दुसरीकडे खडूने लिहिता येते. या बोर्डवर अभ्यास करणे मुलांसाठी फार उत्साह वाढवणारे आहे. एकीकडे या बोर्डबरोबर खेळता खेळता ती अभ्यासही करू शकतात.

टेबल-खुर्ची

डेस्क, स्टोरेज, लाईट असा प्रकार असलेले टेबल मुलांसाठी खरेदी करा. यात त्याच्या अभ्यासाच्या वस्तू ठेवता येतील. तसेच हव्या तेव्हा त्याला त्या मिळतील. त्यामुळे अभ्यास पूर्ण झाल्यावरच तो जागेवरून उठेल.

हेही वाचा: Parenting Tips | मुलांचा हट्ट पुरवा, पण...

loading image
go to top