esakal | Kitchen Tips : 'या' पद्धतीने ओळखा भेसळयुक्त पनीर
sakal

बोलून बातमी शोधा

Paneer

Kitchen Tips : 'या' पद्धतीने ओळखा भेसळयुक्त पनीर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

अनेक जणांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ अजिबात आवडत नाहीत. मात्र, पनीर हा असा एक पदार्थ आहे जो सगळे जण आवडीने खातात. पनीरपासून अनेक विविध पदार्थ तयार केले जातात. यात पनीरची भाजी, पनीर रोल्स, पनीर मोमोज हे पदार्थ अनेकांना आवडतात. कोणत्याही पदार्थामध्ये पनीर मिक्स केलं की त्या पदार्थाची चव दुप्पट होते. त्यामुळे पनीरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ही वाढती मागणी पाहता. सध्या बाजारात अनेक जण भेसळयुक्त पनीरची विक्री करत आहेत. म्हणूनच, भेसळयुक्त पनीर कसं ओळखावं हे आज पाहुयात. (how-to-differentiate-between-real-and-fake-paneer)

हेही वाचा: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' ५ भाज्या

१. जर पनीरमध्ये भेसळ असेल तर ते रबरासारखं लागतं.

२. पनीर ताजं आणि शुद्ध असेल तर त्यात थोडा चिकटपणा असतो. मात्र, तेच भेसळयुक्त असेल तर त्यात चिकटपणा नसतो.

३. भेसळयुक्त पनीर पटकन शिजून मऊ होत नाही.

४. पनीरमध्ये कोरडेपणा असतो.

५. भेसळयुक्त पनीरमध्ये दुधाचा येणारा विशिष्ट वास नसतो.

'या' पद्धतीने ओळखा पनीर शुद्ध आहे की नाही?

प्रथम पनीर पाण्यात टाका आणि ते पाणी उकळून थंड करा. पाणी गार झाल्यावर त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर आयोडीन टिंचर टाकल्यावर पनीरचा रंग बदलला आणि निळा झाला तर समजा या पनीरमध्ये भेसळ आहे.

loading image