Home Remedies for Headache : डोकेदुखीने त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

या घरगुती उपायांनी डोकेदुखीपासून मिळवा आराम...
Home Remedies for Headache : डोकेदुखीने त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

सध्याच्या धकाधकीच्या जिवनात लोकांना कामाचा भरपूर ताण असतो, त्यात लोकं मोबाईलचा वारंवार वापर करताता, ज्यामुळे कमी झोप, डोळ्यांवरती ताण यासारख्या गोष्टीमुळे लोकांमध्ये डोकेदुखीचे प्रमाण सध्या वाढले आहे.

कधीकधी अशी तीव्र डोकेदुखीची सुरूवात होते की, लोकांना काहीही सुचत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या घरगुती उपायांनी डोकेदुखीपासून आराम मिळेल.

अनेक गोष्टी करूनही त्रास कमी होत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता.

सफरचंदावर मीठ टाकून खाल्ल्याने काही मिनिटांत डोकेदुखी दूर होते. तुम्हीही ते जरूर खा. अनेकांना सफरचंद खायलाही खूप आवडतं. जर तुम्ही 1 सफरचंद देखील खाल्ले तर तुम्हाला फायदा होईल.

Home Remedies for Headache : डोकेदुखीने त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
Health Benefits of Beetroot Juice : हिवाळ्यात दररोज बीटाचा रस पिणं आहे फायदेशीर; आरोग्याला मिळतात जबरदस्त फायदे

लवंग चावून खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात. लवंगाचे पाणी तयार करून प्यायले तरी खूप आराम मिळतो. तुम्हाला हवे असल्यास लवंग रुमालात बांधून त्याचा वास घेऊ शकता.

तुळशीच्या पानाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये आले मिक्स करून त्याचे पाणी पिऊ शकता. डोकेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीला यापासून आराम मिळू शकतो.

लवंगाच्या तेलाने मसाज केल्याने डोकेदुखीपासून खूप आराम मिळतो. कपाळाला मसाज करा, डोक्याला बांधा आणि थोडा वेळ झोपा, यामुळे तुमची डोकेदुखी कमी होईल.

कधीकधी शरीरात गॅस तयार झाल्यामुळे डोकेदुखी देखील सुरू होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू मिसळा.

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी लिंबू चहा पिणे चांगले. यासाठी काळ्या चहामध्ये अर्धा लिंबू पिळून प्या. डोकेदुखीच्या समस्येवर मात करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com