
Summer Skin care Tips: उन्हाळ्यामध्ये अनेकजण त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतात. काहीवेळा नियमितपणे सनस्क्रीन Sunscreen लावणं शक्य होत नाही.
अनेकदा आपल्या निदर्शनास येत की आपलं कपाळ हे चेहऱ्यापेक्षा अधिक काळवंडलेलं दिसतंय. how to get rid of sunburn and tanning how to remove forehead darkness
उन्हाचं एक्सपोजर, हार्मोनल बदल, शरीरात पोषक तत्वांती कमतरता तसचं मेनेनिनची वाढ ही यामागची कारणं आहेत. या कारणांमुळे चेहऱ्यापेक्षा Face जास्त कपाळावप टॅनिंग दिसतं किंवा चेहऱ्यावरही मध्ये मध्ये काळसरपणा Tanning जाणवतो.
कपाळाचे हे टॅनिंग दूर करणं किंवा चेहऱ्याच्या एकसारख्या टोनसाठी काही घरगुती आणि सोपे उपाय करणं शक्य आहे. ज्यामुळे कपाळाची टॅनिंग तर दूर होईलच शिवाय संपूर्ण चेहऱ्याचा टोन सारखा दिसेल. हे घरगुती उपाय कोणते हे आज जाणून घेऊयात. Remove forehead tanning
दूध आणि हळद
कपाळावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही दूध आणि हळदीचा वापर करू शकता. यासाठी थोड्या दूधामध्ये हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कपाळाला १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच धुवा. नियमितपणे या पॅकचा वापर केल्याने कपाळ उजळेल.
नाइट केअर
रात्रीच्या वेळी आपल्या शरीरासोबतच आपली त्वचा रिपेयर मोडवर असते. यासाठी कपाळाची टॅनिंग आणि सनबर्न दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दूधात गुलाबपाण्याची काही थेब टाकून कापसाने हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्याला लावा.
रात्रभर ते कपाळाला राहू द्या. यामुळे कपाळाचा काळसरपणा कमी होईल तसचं चेहरा उजळण्यास मदत होईल. Forehead darkness
हे देखिल वाचा-
मध आणि लिंबू
काळवंडलेल्या कपाळासाठी तसचं तेहऱ्यावरील सनबर्नचे चट्टे दूर करण्यासाठी मध आणि लिंबू हा प्रभावी पर्याय आहे. यासाठी मध आणि लिंबाच्या रसाची पेस्ट तयार करून कपाळाला तसचं चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याचा टोन सुधारण्यास आणि सनबर्न दूर होण्यास मदत होते. Home remedies for tanning
बेसन पॅकने कपाळाची टॅनिंग होईल दूर
टॅनिंग आणि सनबर्न दूर करण्यासाठी सेबन हा देखील एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही बेसन आणि कच्च दूध एकत्रित करून पेस्ट तयार करा.यात चिमुटभर हळद टाका. ही पेस्ट कपाळाला लावून १५ मिनिटांनी चेहरा धुवावा.
दररोज हा पॅक लावल्यास आठवडाभराच्या आत कपाळाची टॅनिंग दूर होईल.
काकडीचा वापर करा
कपाळाची टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा रस किंवा किसलेली काकडी कपाळावर लावून कपाळाला स्क्रब करू शकता यामुळे देखील फरक जाणवेल.
पपई फेसपॅक
टॅनिंग दूर करण्यासाठी पपई हा देखील एक प्रभावी पर्याय आहे. यासाठी थोडा काकडीचा गर घेऊन कपाळ आणि चेहऱ्याला स्क्रब करा. त्यानंतर पपईची पेस्ट १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा.
आठवडाभरात टॅनिंग आणि सनबर्नची समस्या कमी होऊन. चेहरा उजळण्यास मदत होईल.
बडीशेपेचं सेवन करा
काही वेळेस हार्मोनल बदल आणि पोट साफ न झाल्याने देखील कपाळ काळवंडतं. अशावेळी तुम्ही आहारामध्ये बडीशेपेचा समावेश करू शकता. सकाळी उपाशी पोटी तुम्ही बडीशेपेचं पाणी पिऊ शकता. यामुळे कपाळाची टॅनिंग दूर होईल.
या काही घरगुची टिप्सच्या मदतीने तुम्ही कपाळाची टॅनिंग दूर करू शकता. तसचं जर तुमचं कपाळ चेहऱ्यापेक्षा जास्त काळवंडलेलं दिसत असले तर कपाळाला न चुकता दर २-३ तासांनी सनस्क्रीन लावणं विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.