Instagram Reels : रिल्सच्या माध्यमातून ‘या’ पद्धतीने वाढवा व्यवसाय, जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

अनेक जण त्यांच्या छोट्या-मोठ्या बिझनेसचे रिल्सच्या माध्यमातून प्रमोशन करत आहेत.
Instagram Reels
Instagram Reelsesakal

मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा चांगलाच विस्तार झाला आहे. अनेक अ‍ॅप्समध्ये झालेली वाढ आणि त्यात वापरकर्त्यांची पडलेली भर यामुळे सोशल मीडियावरील युझर्सची संख्या वाढली. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम हे अ‍ॅप्स आता लोकांच्या रोजच्या आयुष्यातील महत्वाचा भाग झाले आहेत.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनेक सोशल मीडिया स्टार्सचा जन्म झाला. इन्स्टाग्रामस्टोरी, पोस्ट आणि रिल्सचा वापर तरूणाईमध्ये वाढला आहे. रिल्सच्या माध्यमातून अनेक जण भरपूर पैसे कमावत आहेत. अनेक जण त्यांच्या छोट्या-मोठ्या बिझनेसचे रिल्सच्या माध्यमातून प्रमोशन करत आहेत. यातून त्यांच्या व्यवसायाची पब्लिसिटी देखील होते आणि पैशांची कमाई देखील होते.

मात्र, रिल्सचा वापर करून बिझनेसचे प्रमोशन कसे करायचे ? व्यवसाय कसा वाढवायचा ? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर काही टिप्समधून मिळणार आहे. या टिप्स कोणत्या आहेत ? हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हे आर्टिकल नक्की वाचा.

या टिप्सचा वापर करून रिल्सच्या माध्यमातून करा प्रमोशन :

Instagram Reels
Instagram Reels : तरुणाई इन्स्टाग्राम रिल्सच्या मोहात, मनोरंजनाकडे कल यूट्यूबकडे पाठ
  • तुमचा व्यवसाय छोटा किंवा मोठा असो, तुम्ही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. इन्स्टाग्रामवरील रिल्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहचवू शकता.

  • यासाठी रोज अनेक प्रकारचे रिल्स बनवू शकता. ट्रेंडिंग रिल्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा.

  • रिल्सचे नियोजन करून ठेवा, तुमच्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या विषयांची यादी करा. उदा. जर तुमचा व्यवसाय कपड्यांशी निगडीत असेल, तर फॅशन रिलेटेड अनेक विषय तुम्ही निवडू शकता. मग त्यामध्ये साडी, ड्रेसनुसार कॅटेगरी करा आणि ट्रेंडिंग रिल्सचा वापर करा. परंतु, या सगळ्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • रिल्सच्या माध्यमातून तुम्ही ऑडिओ, फिल्टर आणि इतर टूल्सच्या माध्यमातून १५ ते ३० सेकंदांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. इन्स्टाग्रामने यासाठी अनेक प्रकारचे फिचर्स लॉंच केले आहेत.

  • शॉप टॅब या नावाचा ऑप्शन इन्स्टाग्रामवर आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या उत्पादनांची एक लिस्ट करू शकता. हा ऑप्शन ग्राहकांना थेट विक्रीची सुविधा निर्माण करून देते.

  • ई-कॉमर्स साईटवरून जर तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल तर इन्स्टाग्रामचा योग्य प्रकारे वापर करून तुम्ही ग्राहकांना तुमच्या व्यवसायाशी निगडीत असलेली लिंक त्यांना उपलब्ध करून देऊ शकता.

  • आजकाल इन्स्टाग्रामवर लाईव्ह करण्याचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या व्यवसायाचा एक चॅनेल बनवून तुम्ही इन्स्टाग्रामवर थेट लाईव्ह येऊन विक्री करू शकता, किंवा इव्हेंट चालवून नवीन ग्राहकांपर्यंत पोहचू शकता.

  • एवढच काय तर इन्स्टाग्रामवर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी निगडीत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करण्याची पोस्ट देखील शेअर करू शकता. त्यावर तुमचा नंबर, तुमच्या ब्रॅंडची वेबसाईट किंवा त्या प्रॉडक्टची लिंक देखील शेअर करू शकता.

Instagram Reels
Insta Update : इन्स्टाग्रामवर रील्स बनवणाऱ्यांसाठी खुशखबर! अ‍ॅपमध्ये मिळणार मोठं अपडेट; यूजर्सना होणार फायदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com