Long Distance Relationshipमधील भांडण-तंटे कसे हाताळाल ? How to handle conflicts in Long Distance Relationship? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Long Distance Relationship

Long Distance Relationshipमधील भांडण-तंटे कसे हाताळाल ?

मुंबई : नोकरी, अभ्यास आणि इतर अनेक कारणांमुळे बरेच लोक लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये राहातात. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल बोलणं सोपं आहे पण ते नातं निभावणं सोपं नाही. (How to handle conflicts in Long Distance Relationship?)

जोडीदारांमधील अंतर जास्त असल्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होऊ शकतात. हे टाळण्यासाठी काय कराल ? हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

संभाषण थांबू देऊ नका

लांबच्या नात्यात जोडीदाराची भेट खूप कमी होते. यासाठी दोघांनी एकमेकांशी बोलत राहाणे आवश्यक आहे. संभाषणात कधीही खंड पडू देऊ नका अन्यथा भांडणं वाढतील.

एकमेकांचे विचार समजून घ्या

२ भिन्न व्यक्तींची मते भिन्न असू शकतात. अशा वेळी एकमेकांची मते समजून घ्या. जोडीदार चिडला असेल तर तो किंवा ती शांत होण्याची वाट पाहा. त्यानंतर त्यांच्याशी बोला.

समजून घेण्याचा प्रयत्न करा

बहुतेक नात्यात भांडण होण्यामागील कारण म्हणजे जोडीदार एकमेकांना समजून घेत नाहीत. तुमच्या जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टीवर राग येण्याआधी निश्चितपणे विचार करा की कदाचित त्यांचा काही नाइलाज असेल.

काहीवेळा कॉल/मेसेज दुर्लक्षित केल्यामुळे भांडणे देखील होतात जी एकमेकांना समजून घेण्याची गरज दर्शवतात.

संशय घेऊ नका

संशय घेणे टाळा. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर शंका घेत असाल तर त्यामुळे नात्यातील विश्वासाचा प्रश्न वाढतो आणि भांडणाची समस्या वाढू लागते.

टॅग्स :Relationship Tips