Weight Loss : आवडीचे पदार्थ खाऊनही वजन कमी करता येतं, माहितीये का ?

वजन कमी करण्यात आहाराचा मोठा वाटा आहे. त्यामुळे लोकांना असे वाटते की त्यांना वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या पदार्थांवर पाणी सोडावे लागते.
Weight Loss
Weight Loss google

मुंबई : वजन कमी करणे हे अनेक लोकांसाठी कठीण काम आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीच्या खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. ते त्यांच्या चवीनुसार खाद्यपदार्थ निवडतात आणि खातात.

वजन कमी करण्यात आहाराचा मोठा वाटा आहे. त्यामुळे लोकांना असे वाटते की त्यांना वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या पदार्थांवर पाणी सोडावे लागते. मात्र, तसे नाही. (how to lose weight without compromising with your favourite food)

वजन कमी करणे म्हणजे स्वतःला उपाशी ठेवणे किंवा आपले आवडते पदार्थ पूर्णपणे सोडून देणे नाही. फक्त आहारात थोडासा बदल करण्याची गरज आहे. हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Weight Loss
Belly Fat : लोंबकळणारे पोट एका महिन्यात होईल सपाट; फक्त हा छोटासा उपाय करा

आहारावर नियंत्रण ठेवा

आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करणे अनेकांना शक्य होत नाही. पण चांगली सुरुवात केव्हाही करता येते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर सर्वात आधी तुम्ही आहार नियंत्रित करायला शिकले पाहिजे.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला चॉकलेट खायला आवडत असेल तर मोठे चॉकलेट खाण्याऐवजी तुम्ही एकच तुकडा खावा. अशा प्रकारे, आपण सहजपणे आपल्या कॅलरीची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.

तुमच्या आवडत्या अन्नाला एक ट्विस्ट द्या

वजन कमी करण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमचे आवडते अन्न सोडावे लागेल. फक्त हेल्दी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करा.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला पिझ्झा खायला आवडत असेल, तर मैदा बेस ऐवजी पिठाचा बेस बनवा. अशा प्रकारे, जेव्हा तुम्ही पिठाच्या बेसवर भरपूर भाज्या घालून बेक कराल तेव्हा ते आरोग्यदायी असेल.

Weight Loss
Child Health : मुलांना आईवडिलांकडून जन्मत:च मिळतात हे आजार

वेळेचे भान ठेवा

काहीवेळा आपण चुकीच्या वेळी चुकीचे खाल्ल्यामुळे आपले नुकसान होते. आवडीचा पदार्थ खायचा असला तरी वेळेची काळजी घ्यायला हवी. रात्री झोपण्यापूर्वी खाणे टाळा.

त्याचप्रमाणे, सकाळी उठल्यानंतर ४० मिनिटांच्या आत तुमचा नाश्ता करा. रात्री उशिरा खाणे आणि सकाळी जास्त वेळ उपाशी राहणे यामुळे तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि वजन कमी करणे कठीण होते.

तुमचे तेल बदला

जर तुम्हाला तुमचे आवडते पदार्थ हेल्दी बनवायचे असतील आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या तेलांकडेही लक्ष दिले पाहिजे. ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो ऑइल किंवा नारळ तेल यासारखे निरोगी तेल निवडण्याचा प्रयत्न करा.

त्यामध्ये निरोगी फॅट्स असतात आणि ते मध्यम प्रमाणात घेतल्यास ते चरबी जाळण्यास मदत करतात. याशिवाय दर महिन्याला तेल बदलत राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व तेलातून मिळू शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com