ऑफिसमध्ये बॉसबरोबर चांगले संबंध कसे ठेवाल? या 5 टीप्स फॉलो करा

ऑफिसमध्ये बॉसबरोबर चांगले संबंध कसे ठेवाल? या 5 टीप्स फॉलो करा

ऑफिसमध्ये तुमचे आणि बॉसमध्ये चांगले संबंध असणे हे महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या बॉसबरोबर चांगले संबंध ठेवल्यास त्याचा तुमच्या करिअरच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. बॉसबरोबर चांगले नाते निर्माण करण्याचा अर्थ म्हणजे त्याचा फायदा घेणे असा होत नाही. जेव्हा तुम्ही मर्यादेत काम कराल, कामाची जाणीव ठेवाल तेव्हाच चांगला कर्मचारी म्हणून तुम्हाला ओळखले जाईल. तसेच बॉसनेही कर्मचाऱ्यांबरोबर हेल्दी संबंध ठेवणे गरजेचे आहे. दोघांनी एकमेकांबरोबर चांगले संबंध ठेवणे हे तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम करतील. त्यामुळे बॉसशी संबंध कसे ठेवायचे हे जाणून घेऊ.

ऑफिसमध्ये बॉसबरोबर चांगले संबंध कसे ठेवाल? या 5 टीप्स फॉलो करा
मार्क झुकरबर्ग नेहमी एकसारख्या कपड्यात का दिसतो ?स्वत:च सांगितले कारण
esakal

पुढाकार घ्या

प्रोजेक्ट मिळाल्यावर कर्मचारी नाविन्यपूर्ण काम करतील आणि सक्रिय असतील अशांच्या शोधात व्यवस्थापन नेहमीच असते. तुम्ही तुमचा उत्साह आणि नवे विचार प्रकट करा. असे केल्याने तुम्ही त्यांच्या कंपनीत आहात म्हणून तुम्ही असे वागत नाही तर तुम्ही मुळातच तसे आहात हे त्यांच्या लक्षात येईल. पण यामुळे तुमच्या कंपनीला फायदा होईल.

बॉसशी चर्चा करा

तुमच्या बॉसशी स्पष्टपणे गुणवत्तापूर्ण संभाषण करणे हा एक चांगला मार्ग आहे. ज्याद्वारे तुम्ही चांगले नाते वाढवू शकता. पण ते तुमच्याकडून अपेक्षा करत नसतानाही तुम्ही त्यांना सूचना दिली पाहिजे, असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही सतत सूचना दिल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होईल. वेळ ठरवून त्यांच्याशी मिटिंग घेणे, हा चांगला पर्याय आहे. यावरून तुम्ही त्यांच्या वेळेचा आदर करता असे दिसून येईल. या बैठकीत मीटिंगमधील मुद्यांवर चर्चा करा आणि आपले काम सुरू करा.

वैयक्तिक संपर्क ठेवताना काळजी घ्या

वैयक्तिक संपर्कांचा उपयोग करणे हे कठीण काम असते. पण जर योग्य प्रकारे त्याचा उपयोग केला तर व्यवसायाबद्दल बोलणे सोपे नाही, असे तुम्ही बॉसला दाखवू शकता. याचा अर्थ तुम्ही अधिक जाणता असा होत नाही. त्यांच्या आयुष्याबद्दल काही विचारणे, त्यांना प्रश्न विचारणे यामध्ये एक अंतर असावे. काही प्रश्नांमुळे कदाचित त्यांना अस्वस्थ वाटू शकते. तुम्ही त्यांच्या विकेंडबाबत किंवा छंदांबद्दल विचारणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

ऑफिसमध्ये बॉसबरोबर चांगले संबंध कसे ठेवाल? या 5 टीप्स फॉलो करा
Resume पाहिला जातो फक्त 6 सेकंद, नोकरीसाठी 'असे' करा नियोजन
Team eSakal

चांगले काम करा

"तुमचे काम शब्दांपेक्षा जास्त बोलते" अशी एक म्हण आहे. जर तुम्ही अधिक आत्मविश्वासाने संवाद साधू शकत नसाल तर अधिक मेहनत करून तुम्ही तुमच्या बॉसशी नाते निर्माण करू शकता. तुमचा बॉस नियमितपणे ऑफिसमध्ये येत नसला, तुमच्या टीमला भेटत नसला किंवा तुमच्याशी थेट बोलत नसला तरीही काळजी करू नका. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल.

ध्येय निश्चित करा

तुमच्या बॉसकडून फीडबॅक मागणे हे अत्यंत योग्य आहे. बॉसच्या दृष्टिकोनातून, हे दर्शविते की तुम्हाला प्रकल्पाची आणि तुमच्या भविष्यातील कामगिरीची काळजी आहे, सुधारणा कशी करावी हे जाणून घ्यायचे आहे.तुम्हाला दिलेल्या प्रोजेक्ट्सवरून हे दिसते की बॉसने दिलेले काम हे कामाचा भाग असून तुम्ही खरोखर तुमच्या कामात गुंतलेले आहात आणि काम यशस्वी होण्यासाठी मदत करू शकता. तसेच तुमच्‍या बॉसला तुमच्‍या योजना काय आहेत आणि तुम्‍हाला ही उद्दिष्टे किती लवकर साध्य होताना दिसत आहेत हे सांगणेही गरजेचे आहे. कंपनी किंवा तुमच्या बॉसशी तुम्हाला काय हवे आहे याबद्दल मोकळेपणाने बोला. तुम्ही महत्त्वाकांक्षी, प्रामाणिक आणि पुढचा विचार करणारे असाल अशी त्यांची अपेक्षा असावी.

ऑफिसमध्ये बॉसबरोबर चांगले संबंध कसे ठेवाल? या 5 टीप्स फॉलो करा
प्रत्येक मुलीच्या बॅगेत असाव्यात 'या' 6 गोष्टी! थंडीत मिळेल आराम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com